Buldhana baldness disease direct connection with lonar lake the dean of the medical college minakshi gajbhiye said it about water


बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील काही गावांतील गावकरी त्रस्त आहेत. येथील काही गावांमधील लोकांचे केस अचानक गळायला सुरुवात झाली. आणि त्यांना टक्कलाची समस्या भेडसावते आहे. अचानक उद्भवलेल्या या समस्येने आरोग्य यंत्रणा देखील चक्रावली होती. यामागचे कारण शोधण्यासाठी आरोग्य यंत्रणेने गुरुवारी तातडीने येथील पाणी तपासणीसाठी पाठवले होते. त्यानंतर आता येथील लोणार सरोवराचे या आजाराशी कनेक्शन असू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (buldhana baldness disease direct connection with lonar lake the dean of the medical college minakshi gajbhiye said it about water)

जिल्ह्यातील टक्कल पडण्याच्या आजारावर अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्या डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी एक शक्यता व्यक्त केली आहे. लोणार सरोवराचे पाणी भूगर्भात मोठ्या प्रमाणात खोल झिरपून त्यातील घटकांमुळे हा आजार होत असावा असा डॉ. गजभिये यांचा अंदाज आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी ही शक्यता व्यक्त केली. तालुक्यातल्या सध्या सुरू असलेल्या आजारावरील चर्चेवर त्यांनी हे भाष्य केलं. दरम्यान, शेगाव तालुक्यातील केस गळती तसेच टक्कल पडणाऱ्यांची संख्या 100 वर पोहोचली असून गुरुवारी 36 नवीन टक्कल बाधित रुग्ण आढळले आहेत.

– Advertisement –

हेही वाचा – CM Devendra Fadnavis : स्वतंत्र विदर्भाबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस? सांगितला कन्नमवारांचा किस्सा

या आजारासंदर्भातील तथ्य शोधण्यासाठी अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयानेही पुढाकार घेतला आहे. अकोला शासकीय महाविद्यालयाने या गावातील सात रुग्णांच्या डोक्याचे त्वचेचे नमुने बायोप्सीसाठी घेतले. पाणी आणि त्वचेसंदर्भातील अहवालाला किमान सात दिवसाचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच या आजारासंदर्भातील नेमके कारण समोर येणार असल्याचे सांगण्यात आले.

– Advertisement –

शेगाव येथील सहा गावांमध्ये केस गळून टक्कल पडण्याचं प्रमाण झपाट्याने वाढतंय. आतापर्यंत या सहा गावांमधील 51 लोकांचे केस गळाले आहेत. आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली असून बुलढाणा येथील आरोग्य विभागाने गावातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी नागपूरच्या प्रादेशिक प्रयोगशाळेत पाठवले आहेत.

बुलढाणा जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते म्हणाले की, जिल्ह्यातील केस गळती प्रकरणी पाण्याचे जे नमुने तपासणीसाठी पाठवले होते, त्याचा अहवाल आला आहे. हे पाणी वापरण्यासाठी तसेच पिण्यासाठी योग्य नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या पाण्यात नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे. नायट्रेटचे प्रमाण 10 टक्के असायला हवे ते 54 टक्के एवढे झाले आहे. तर क्षाराचे प्रमाण 2100 आहे. ते केवळ 110 असायला पाहिजे. त्या भागातील पाणीच घातक आहे. आर्सेनिक, लीड तसेच रासायनिक घटक तपासणीसाठी पाण्याचे नमुने पुणे प्रयोगशाळेत पाठविल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

हेही वाचा – SC about Railway : रेल्वे तिकीट प्रणालीचा गैरवापर रोखलाच पाहिजे, सुप्रीम कोर्टाचे स्पष्ट मत

सुरुवातीला लोकांना डोक्यात खाज येण्यास सुरुवात होते. त्यानंतर तिसऱ्या दिवशी जवळपास सगळे केस गळतात आणि टक्कल पडते. केवळ पुरुषच नाही तर महिलांना देखील याचा त्रास झाला आहे.



Source link

Comments are closed.