शाब्बास स्मृती! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला नवा विक्रम, दिग्गज मिताली राजला टाकले मागे
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार स्मृती मंधाना हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा विक्रम केला आहे. तिने महिलांच्या वनडे क्रिकेटमध्ये सर्वात जलद 4000 धावांचा टप्पा गाठला. हा विक्रम तिने अवघ्या 94 डावांमध्ये पूर्ण केला. याआधी हा पराक्रम टीम इंडियाच्या मिताली राजच्या नावावर होता. मितालीने ही कामगिरी 112 डावांत केली होती.
सध्या भारत आणि आयर्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. मालिकेच्या पहिल्या सामन्यात स्मृतीने ही कामिगिरी केली. राजकोट येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात भारतीय संघाने 6 गडी राखून विजय मिळवला. आयर्लंडनं प्रथम फलंदाजी करताना 238 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, भारताने 239 धावांचं लक्ष्य 34.3 षटकांत 4 गडी गमावून गाठलं.
स्मृती मंधानाने या सामन्यात 6 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 41 धावा केल्या. भारतासाठी प्रतिका रावल आणि तेजलने दमदार फलंदाजी केली. या दोघींनी अर्धशतकं ठोकले. प्रतिकानं 89 धावा केल्या. तर तेजलनं 53 धावांचं योगदान दिलं. त्यांच्या फलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने या सामन्यात सहज विजय मिळवला.
स्मृती मंधानासाठी 2024 हे वर्ष खूपच चांगलं राहिलं. ती एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. यासह तिने एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या महिला क्रिकेटपटूचा विक्रम मोडला. याशिवाय तिने 2024 मध्ये भारताच्या एकमेव कसोटी सामन्यात शतक झळकावलं. तिनं वर्षभरात चार एकदिवसीय शतके केली, जी इतिहासातील कोणत्याही महिला खेळाडूनं केलेली सर्वाधिक शतके आहेत.
आयर्लंडविरुद्धची ही मालिका भारताची आयसीसी महिला चॅम्पियनशीप 2025 मधील शेवटची मालिका आहे. त्यानंतर खेळाडूंना महिला प्रीमियर लीगवर लक्ष केंद्रित करावे लागेल.
हेही वाचा –
आधी बॅट तुटली, नंतर डोक्यावर आदळली! डेव्हिड वॉर्नरसोबत घडली विचित्र घटना; VIDEO व्हायरल
शुबमन गिलकडे वनडेत मोठा विक्रम रचण्याची संधी, ही कामगिरी करणारा बनेल पहिलाच खेळाडू
श्रीलंका दौऱ्यावर कर्णधारपद मिळाल्यानंतर स्टीव्ह स्मिथची प्रतिक्रिया, म्हणाला..
Comments are closed.