INDW vs IREW; भारताची विजयी सुरूवात, प्रतिका रावलची दमदार खेळी

आजपासून (10 जानेवारी) भारतीय महिला संघ आणि आयर्लंड महिला संघातील 3 सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरूवात झाली आहे. दरम्यान दोन्ही संघातील पहिला वनडे सामना सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाने 6 विकेट्सने शानदार विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान भारतासाठी युवा सलामीवीर प्रतिका रावलने (Pratika Rawal) दमदार खेळी केली.

सामनावीर म्हणून निवड झालेल्या प्रतिकाने तिच्या अनुभवापेक्षा अधिक संयमी खेळ दाखवला, तर तेजल हसबनीसने (Tejal Hasabnis) अर्धशतक झळकावून संस्मरणीय पुनरागमन केले. तेजलने तिचा शेवटचा वनडे सामना ऑक्टोबर 2024 मध्ये न्यूझीलंडविरूद्ध खेळला. प्रतिका आणि तेजल दोघींनी 84 चेंडूत 116 धावांची भागीदारी रचली. ही भागीदारी भारताच्या विजयासाठी महत्वाची ठरली.

सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडची सुरूवात खराब झाली. संघाने 27 धावांवर पहिली विकेट गमावली. सारा फोर्ब्स फक्त 9 धावा करून बाद झाली. यानंतर, उना रेमंड 5 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतली. ओर्ला 9 धावा करून बाद झाला. पण कर्णधार गॅबी लुईसने एका टोकाला धरून ठेवले. तिने 15 चौकारांच्या मदतीने 92 धावा केल्या. ली पॉलनेही चांगली कामगिरी केली. तिने 7 चौकारांच्या मदतीने 59 धावा केल्या.

आयर्लंडने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने अवघ्या 34.3 षटकांत सामना जिंकला. भारतासाठी सुरूवात चांगली झाली. कर्णधार स्म्रीती मानधना (Smriti Mandhana) आणि प्रतिका रावल (Pratika Rawal) यांच्यात एक मजबूत भागीदारी झाली. मानधनाने 6 चौकार आणि 1 षटकारासह 41 धावा केल्या. तर प्रतिकाने 10 चौकार, 1 षटकारासह 89 धावा केल्या. तेजल हसबनीस पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आली. तिने नाबाद अर्धशतक झळकावले. दरम्यान तिने 53 धावा केल्या. यावेळी तिच्या बॅटमधून 9 चौकार निघाले.

भारताकडून प्रिया मिश्राने शानदार गोलंदाजी केली. तिने 9 षटकांत 56 धावा देत 2 विकेट्स घेतल्या. यासोबतच तिने 1 मेडन ओव्हरही टाकली. तितस साधू आणि सायली सातघरे यांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. तर दीप्ती शर्मानेही 1 विकेट आपल्या नावावर केली.

महत्त्वाच्या बातम्या-

बीसीसीआय जय शाह यांना करणार सन्मानित? कारण काय?
शाब्बास स्मृती! आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केला नवा विक्रम, दिग्गज मिताली राजला टाकले मागे
आधी बॅट तुटली, नंतर डोक्यावर आदळली! डेव्हिड वॉर्नरसोबत घडली विचित्र घटना; VIDEO व्हायरल

Comments are closed.