विधानसभा निवडणुकीत परळीत 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं, जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

विधानसभा निवडणुकीत परळी मतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आलं, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. त्यांनी आपल्या X अकाउंटवर एक रिपोस्ट करत व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक व्यक्ती मतदान करताना दिसत आहे. ही व्यक्ती अजित पवार गटाला मतदान करताना दिसत आहे.

हा व्हिडीओ शेअर करताना जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत की, ”परळी मतदारसंघात 201 बूथ ताब्यात घेऊन मतदान करण्यात आले. शाई लावायची आणि बाहेर जायचे मतदान केंद्राच्या आतमध्ये तुमचे बटन दाबण्याचे काम ही गॅंग करायची.” ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीनंतर लोकांच्या मनामध्ये ईव्हीएम आणि निवडणुकी संदर्भात अनेक शंका झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे परळी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख हे होते. ते निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक मतदान केंद्रात जात होते.”

आव्हाड म्हणाले, ”परळी विधानसभा मतदारसंघात एकूण 396 बूथ आहे. लोकसभा निवडणुकीत झालेल्या धांदळीनंतर उच्च न्यायालयाने 122 बूथ अतिसंवेदनशील असल्याचे म्हटले होते. या बुथवर अतिरिक्त सुरक्षा पूर्व, असं म्हटलं होतं. या बुथवर सुरक्षा पुरवण्याची जबाबदारी जिल्हा अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच निवडणूक अधिकाऱ्यांची होती. मात्र या निवडणुकीत 201 बुथवर हल्ले झाले होते. तर 101 बूथ कॅप्चर करण्यात आले होते.”

Comments are closed.