रोहित शर्मा नाही, तर हा खेळाडू सर्वोत्कृष्ट कर्णधार, माजी क्रिकेटपटूचे मोठे वक्तव्य
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) हा अलिकडच्या काळात सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक आहे. त्याने त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला अनेक कठीण सामन्यात यश मिळवून दिले आहे. ज्यामध्ये गेल्या वर्षीच्या टी20 विश्वचषकाचा देखील समावेश होता. पण आता माजी भारतीय क्रिकेटपटू दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) भारतीय संघाचा विश्वचषक विजेता कर्णधार रोहित शर्माला नाही तर दुसऱ्या कोणाला तरी सर्वोत्तम कर्णधार मानतो.
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) सध्या दिनेश कार्तिकसाठी सर्वोत्तम कर्णधार नाही. उलट, त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला (Pat Cummins) सध्याच्या काळातील सर्वोत्तम कर्णधार म्हटले आहे. त्याचा असा विश्वास आहे की पॅट कमिन्स हा जगातील सर्वात आक्रमक क्रिकेटपटू आहे आणि तो एखाद्या गटाचे नेतृत्व करण्यासाठी सर्वोत्तम कर्णधार मानला जाऊ शकतो.
हेसीबीच्या नवीन भागात बोलताना दिनेश कार्तिक म्हणाला, “मला वाटतं तो (पॅट कमिन्स) सध्या जगातील सर्वात आक्रमक क्रिकेटपटू आहे. तो हे त्याच्या भाषणातून किंवा त्याच्या अपमानास्पद भाषेतून करत नाही. तो हे त्याच्या देहबोलीतून, माध्यमांशी ज्या पद्धतीने वागतो त्या पद्धतीने करतो. त्याच्याकडे त्याच्या संघाच्या एका गटाचे नेतृत्व करण्याची क्षमता आहे आणि माझ्या मते, तो सध्या जगातील नंबर वन कर्णधार आहे.”
ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज आणि कर्णधार पॅट कमिन्सने कांगारू संघाचे कर्णधारपद स्वीकारल्यापासून त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. अलीकडेच बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) जिंकण्यापूर्वी, ऑस्ट्रेलियाने पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली 2023चा वनडे विश्वचषकही (ODI World Cup) जिंकला होता आणि त्याच वर्षी, त्याच्या नेतृत्वाखाली, ऑस्ट्रेलियाने आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचे (ICC World Test Championship) विजेतेपदही जिंकले होते. तो ऑस्ट्रेलियन संघाला सतत नवीन उंचीवर घेऊन जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
RCBच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! बिग बॅश लीगमध्ये ‘या’ स्टार खेळाडूने पाडला धावांचा पाऊस
INDW vs IREW; भारताची विजयी सुरूवात, प्रतिका रावलची दमदार खेळी
बीसीसीआय जय शाह यांना करणार सन्मानित? कारण काय?
Comments are closed.