मार्क झुकरबर्ग यांच्या हातात 7.7 कोटींचे घडय़ाळ
मेटा कंपनीचे सर्वेसर्वा मार्क झुकरबर्ग यांच्या हातात तब्बल 7.7 कोटी रुपये किमतीचे घडय़ाळ दिसले. मार्क झुकरबर्ग मेटा प्लॅटफॉर्मसंबंधी एक मोठी घोषणा करत असताना त्यांच्या हातात हे घडय़ाळ दिसले. यावर सोशल मीडियावर वेगवेगळय़ा कमेंट येत आहेत. झुकरबर्ग यांच्या हातात जे घडय़ाळ आहे, ते ग्रेयूबेल फोर्से हँड मेड 1 नावाचे घडय़ाळ आहे. हे घडय़ाळ प्रचंड महाग असून कंपनी वर्षात एक किंवा दोन घडय़ाळ बनवते. मार्क झुकरबर्ग आणि त्यांची पत्नी प्रिसिला चान हिंदुस्थानात अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या प्री-वेडिंगसाठी आले होते त्या वेळी अनंत अंबानी यांच्या हातात असलेल्या घडय़ाळाची स्तुती झुकरबर्गच्या पत्नीने केली होती, हा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला होता.
Comments are closed.