Sanjay Raut clarification after giving his support in the local government body elections rrp


स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचे आहेच. जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय, असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज शनिवारी (11 जानेवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना केले. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मात्र आता स्वबळाच्या नाऱ्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये नागपूरपासून मुंबईपर्यंत आम्ही स्वबळावर लढणार आहोत. एकदा आम्हाला पाहायचे आहेच. जे काही होईल ते होईल, आमचं असं ठरतंय, असे विधान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आज शनिवारी (11 जानेवारी) प्रसार माध्यमांशी बोलताना केले. ज्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. राऊतांच्या या विधानामुळे मविआत काही आलबेल नसून आता ही फूट उघडपणे पडल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता स्वबळाच्या नाऱ्यावर संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. (Sanjay Raut clarification after giving his support in the local government body elections)

संजय राऊत यांच्या स्वबळाच्या घोषनेनंतर महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. काँग्रेस आणि शरद पवार गटाकडून संजय राऊत यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया समोर येत आहे. आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले की, त्यांची स्वबळावर लढण्याची जर का इच्छा असेल तर त्यांना थांबवणारे आम्ही कोण? पण विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर आपण एकत्रित राहायला हवे होते, असे माझे मत आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, संजय राऊत यांनी केलेली घोषणा पक्षाची भूमिका असेल तर आम्ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी याबाबतची चर्चा करू, असे म्हटले. याचपार्श्वभूमीवर भंडारा दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांना स्वबळाच्या नाऱ्यामुळे महाविकास आघाडीत वितुष्ट येईल का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

– Advertisement –

हेही वाचा – Vijay Wadettiwar : ठाकरेंना विनंती करू, त्यांनी ऐकले तर ठीक अन्यथा…; राऊतांच्या विधानावर वडेट्टीवारांचे स्पष्ट मत

संजय राऊत म्हणाले की, नागपूर लोकसभेमध्ये इंडि आघाडीची स्थापन केली होती, तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी स्थापन केली आहे. परंतु आघाडीमध्ये अनेक कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा पूर्ण होत नाही. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याची संधी दिली पाहिजे. यासाठी आम्ही नागपूर आणि मुंबईसह सर्व महापालिकांमध्ये स्वबळावर निवडणूक लढण्याचा नारा दिला आहे. इतर पक्षांनी सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी स्वबळावर निवडणूक लढवावी, असा सल्ला संजय राऊत यांनी केला. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये ठाकरे गट स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

– Advertisement –

संजय राऊत काय म्हणाले होते?

दरम्यान, आज सकाळी नागपूर येथे आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधताना संजय राऊत म्हणाले होते की, मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली आहे. त्यानंतर आमचं असं ठरतंय की, मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथील कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार? आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. त्यामुळे महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावेत, असा सल्ला संजय राऊत यांनी संजय राऊत महाविकास आघाडीतील घटक पक्षांना दिला होता.

हेही वाचा – Jitendra Awhad : मविआत फूट? राऊतांच्या स्वबळाच्या घोषणेनंतर आव्हाडही म्हणाले – त्यांना थांबवणारे आम्ही कोण? 



Source link

Comments are closed.