निवडणुकीपूर्वी 'आप'ला मोठा धक्का बसला आहे

आमदार मोहिंदर गोयल यांना चौकशीसाठी पाचारण

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दक्षिण दिल्ली पोलिसांनी आप पक्षाचे आमदार महेंद्र गोयल यांना नोटीस बजावत शनिवारी चौकशीसाठी पाचारण केले. मोहिंदर गोयल हे रिठाळा मतदारसंघातील आमदार आहेत. याशिवाय, ‘आप’ने त्यांना या विधानसभा निवडणुकीतही रिठाळा येथून उमेदवारी दिली आहे. गोयल यांच्या चौकशीमुळे आम आदमी पक्षाला निवडणुकीपूर्वी धक्का बसला आहे.

बांगलादेशी घुसखोरांकडून जप्त केलेल्या कागदपत्रांमध्ये गोयल यांची सही आणि शिक्का सापडला आहे. बांगलादेशींसाठी बनावट आधार कार्ड बनवणाऱ्या एजंटच्या चौकशीदरम्यान सत्य उघड झाले. बांगलादेशींसाठी बनावट कागदपत्रे बनवण्याच्या प्रकरणात रिठाळा आमदार गोयल यांची भूमिका समोर आली आहे. एजंटकडून मोहिंदर गोयल यांनी स्वाक्षरी केलेली कागदपत्रे जप्त केली आहेत. या प्रकरणात आमदारांचे सहकारी कर्मचारीही चौकशीच्या कक्षेत आले आहेत. सध्या दक्षिण दिल्ली जिल्हा पोलीस बेकायदेशीर बांगलादेशींना स्थायिक करण्याच्या प्रकरणाची चौकशी करत आहेत.

मोहिंदर गोयल 2020 मध्ये रिठाळा विधानसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा आमदार झाले. ते व्यवसायाने प्रॉपर्टी डीलर आहेत. सध्या ते रोहिणी येथे राहतात. 2015 मधील विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाकडून उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी भाजपचे बलाढ्या नेते कुलवंत राणा यांचा पराभव केला होता.

Comments are closed.