युवराज सिंगचे वडील कपिल देव यांना मारण्यासाठी बंदूक घेऊन त्यांच्या घरी पोहोचले होते, जाणून घ्या कारण
दिल्ली: भारताचा माजी फलंदाज युवराज सिंगचे वडील योगराज सिंग यांनी रविवारी एका मुलाखतीत कपिल देव यांच्याबद्दल धक्कादायक खुलासा केला आहे. योगराजने सांगितले की, जेव्हा त्याला भारतीय संघातून वगळण्यात आले तेव्हा तो रागाने कपिल देव यांच्या घरी पोहोचला आणि जीवे मारण्याची धमकी दिली. कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली संघातून वगळण्यात आल्याने तो खूप संतापला असल्याचे त्याने सांगितले.
योगराज 'अनफिल्टर्ड बाय समदीश' मध्ये म्हणाले, “जेव्हा कपिल देव भारत, उत्तर विभाग आणि हरियाणाचे कर्णधार झाले, तेव्हा त्यांनी मला कोणतेही ठोस कारण न देता संघातून वगळले. माझ्या पत्नीला (युवराजची आई) कपिलला प्रश्न विचारायचे होते, पण मी त्याला धडा शिकवेन असे सांगितले.
तो म्हणाला, “मी माझे पिस्तूल घेऊन कपिलच्या सेक्टर-९ येथील घरी पोहोचलो. तो आईसोबत बाहेर आला. मी त्याला खूप शिव्या दिल्या आणि म्हणालो की तुझ्यामुळे मी एक मित्र गमावला. मला तुझ्या डोक्यात गोळी मारायची होती, पण तुझ्या आईमुळे मी ते केले नाही.”
योगराज पुढे म्हणाले, “त्या दिवशी मी ठरवले की मी क्रिकेट खेळणार नाही, तर युवराज खेळणार आहे. बिशनसिंग बेदी आणि इतर काही लोकांनी माझ्याविरोधात कट रचला होता. बिशनसिंग बेदी (मुख्य निवडकर्ता) यांनी मला संघात निवडले नाही कारण त्यांना वाटत होते की मी सुनील गावस्करचा माणूस आहे आणि मुंबईत क्रिकेट खेळलो. मी गावस्कर यांच्या खूप जवळ होतो. आपण बिशनसिंग बेदींना कधीच माफ केले नाही, असेही योगराज म्हणाले.
संबंधित बातम्या
Comments are closed.