ज्युनियर अब्दुल्लांचे सूर बदलले, ठाकरे गटाचा घणाघात


(Thackeray about Omar Abdullah) मुंबई : नॅशनल कॉन्फरन्स इंडि आघाडीचा सदस्य आहे. या पक्षाचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी बॉम्ब टाकला आहे की, इंडि आघाडी लोकसभा निवडणुकीपुरतीच जन्मास आली. आता गरज संपल्याने इंडि आघाडी बरखास्त केली पाहिजे. या आघाडीकडे ना कोणता खास कार्यक्रम, ना नेतृत्व. ज्युनियर अब्दुल्लांचे सूर जम्मू-कश्मीरचे मुख्यमंत्री झाल्यावर बदलले आहेत, अशी घणाघाती टीका ठाकरे गटाने केली आहे. (Criticism of Thackeray group on Omar Abdullah regarding INDIA)

मुख्यमंत्री म्हणून त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची कृपादृष्टी लागणार आहे. कारण जम्मू-कश्मीर केंद्रशासित राज्य बनले हे खरे असले तरी अब्दुल्ला यांची विधाने नाकारता येणार नाहीत, असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने सामना दैनिकातील अग्रलेखाद्वारे म्हटले आहे.

– Advertisement –

अब्दुल्ला म्हणतात, इंडिया आघाडीची शेवटची बैठक 1 जून 2024 रोजी झाली होती. त्यानंतर हरियाणा, जम्मू-कश्मीर, महाराष्ट्र, झारखंडच्या विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीत काँग्रेसला मोठी झेप घेता आली नाही. हरियाणा आणि महाराष्ट्रात काँग्रेसला पराभव पत्करावा लागला. त्यानंतर इंडि आघाडीच्या अस्तित्वावर प्रश्न विचारले जाऊ लागले, असे या अग्रलेखातून नमूद करण्यात आले आहे.

हेही वाचा – Devendra Fadnavis : राजा होणं म्हणजे…चाणक्यांची आठवण काढत काय म्हणाले मुख्यमंत्री फडणवीस

– Advertisement –

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी तर जाहीरपणे सांगितले की, ‘इंडि आघाडी’ मीच बनवली आणि आता संधी मिळाली तर या आघाडीचे नेतृत्व करायला मी तयार आहे. याचा दुसरा अर्थ काँग्रेसचे नेतृत्व काहींना मान्य नाही. त्यामुळे इंडि आघाडीचा वृक्ष बहरताना दिसत नाही. राष्ट्रीय जनता दलाच्या लालू्प्रसाद यादव यांनीही तीच समांतर भूमिका मांडली, असे सांगत ठाकरे गटाने काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

देशात इंडि आघाडी आणि राज्यात महाविकास आघाडी हे एक त्रांगडेच झाले आहे, अशी भावना लोकांत निर्माण झाली असेल तर त्यास जबाबदार कोण? या दोन्ही आघाड्या निर्माण झाल्या आणि कामास लागल्या तेव्हा आघाडीतील प्रत्येक घटक पक्षात तसेच एकंदरीत जनमानसात उत्साह निर्माण झाला. देशावर लादलेला मनमानी कारभार, भ्रष्टाचार याविरुद्ध लढणारी एक शक्ती निर्माण झाल्याचा आत्मविश्वास भारतीयांत संचारला होता, असे ठाकरे गटाने म्हटले आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तसेच महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारचा पराभव होऊ शकतो ही भावना विजेसारखी तळपू लागली, पण आता या दोन्ही आघाड्या निस्तेज आणि निष्क्रिय ठरत आहेत काय? देशासाठी हे बरे नाही, असे मत ठाकरे गटाने व्यक्त केले आहे. (Criticism of Thackeray group on Omar Abdullah regarding INDIA)

हेही वाचा – Supriya Sule : कोणताही जिल्हा हा…; पंकजा मुंडेंच्या टीकेवर सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर



Source link

Comments are closed.