मुख्य आरोपीला सोडून इतर आरोपींवर मकोका का लावला? खासदार बजरंग सोनावणे यांचा सवाल

वाल्मीक कराडमुळे अजूनही काही लोक भयभीत आहेत असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार बजरंग सोनावणे यांनी केले आहे. तसेच वाल्मीक कराड सोडून सर्व आरोपींवर मकोका का लावला अशी विचारणाही त्यांनी केली.

आज बजरंग सोनावणे यांनी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना सोनावणे म्हणाले की, भयभीत करणारे वातावरण जर आमच्या गावात निर्माण होत असेल तर मायबाप सरकार न्याय कधी देणार? न्याय देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे का असा प्रश्न त्यांनी विचारला.

तसेच सरपंच देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटून गेला. तरी वाल्मीक कराडवर खुनाचा गुन्हा दाखल झाला नाही. मुख्य आरोपी सोडून सर्व आरोपींना मकोका लावला. आरोपीवर विविध भागातून तक्रार दाखल करायला जातात पोलीस ही तक्रार घेत नाही. ही दुर्दैवी बाब आहे. वाल्मीक कराड बाहेर आला तर आमच्या जिवाला धोका आहे अशी भीती लोकांना आहे. या प्रकरणात पोलीस कुणाला वाचवत आहे? असा सवाल सोनावणे यांनी विचारला.

Comments are closed.