दापोली तालुक्यातील शासकीय कार्यालयात बायोमेट्रिकचे तीन तेरा; प्रशासनाचे दुर्लक्ष
कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम करावे आणि शासकीय कामकाजात दिरंगाई होऊ नये, या उद्देशाने शासनाने बायोमेट्रिक पद्धत अंमलात आणली. मात्र, अनेक शासकीय विभागात ही प्रणाली कार्यान्वित दिसत नसल्याने कर्मचाऱ्यांची अडचण होत आहे. तसेच त्यांच्या कामाच्या वेळेची नोंदणी होत नसल्याने ‘आओ जाओ घर तुम्हारा’ असे चित्र सध्या दापोली तालुक्यात शासनाच्या सर्वच विभागात दिसत आहे. त्यामुळे शासकीय प्रशासकीय कार्यालयातील कामचुकार कर्मचार्यांना लगाम लावण्यात शासकीय यंत्रणा कुचकामी ठरल्याचे दिसतआहे.
दापोली तालुक्यात विविध शासकीय आस्थापनांच्या कार्यालयात लावण्यात आलेले बॉयोमेट्रिक यंत्र नादुरुस्त आहेत. तर काही आस्थापनांच्या कार्यालयात यंत्रांमध्येच मुद्दाम बिघाड करण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे. एकंदरित शासकीय कर्मचार्यांकडून बायोमेट्रीक पद्धतीला ठेंगाच दाखवल्याचा प्रकार दापोलीतील सरकारी आस्थापनांच्या कार्यालयांमध्ये दिसत आहे. त्यामुळे काही शासकीय अधिकारीच शासनाची दिशाभूल करत असल्याचे चित्र आहे.
कर्मचार्यांच्या अनियमितेमुळे शासकीय कार्यालयांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचा प्रत्यय अनेकदा येथे कामासाठी आलेल्या अभ्यागंताना येतो. कार्यालयातील आस्थापनेत असलेले कार्यरत कर्मचारी अधिकारी कार्यालयीन वेळेत येत नाहीत. त्यात अधिकारी कर्मचारी हे नेमणूक असलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी राहत नाहीत ते अन्य तालुक्यातून ये-जा करून कार्यालयीन कर्तव्य बजावीत असतात. सकाळी कार्यालयात उशिरा येणे, संध्याकाळी लवकर जाणे असे अनेक कर्मचाऱ्यांचे नित्याचेच झाले आहे. यासाठी शासनाने बायोमेट्रिक पद्धत सुरू केली. तरी ही अशा कामचुकार कर्मचार्याना लगाम लावण्यास शासनच सपेशल अपयशी ठरलेले दिसत आहे. शासनाने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी प्रतिक्रिया दापोलीत सर्वच स्तरावरुन उमटत आहे.
Comments are closed.