वाल्मिक अण्णावर खोटे गुन्हे दाखल, कोणाला किती टक्केवारी मिळते मला माहीत; न्यायालयाबाहेर वकील संतापले


सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आण्णावर (वाल्मिक कराड) खोटे गुन्हे दाखल झाले असतील, अशा प्रकारे कुणी स्टंटबाजी करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. खपवून घेणार नाही. अहो कोण हे टक्केवारीवाले, असं म्हणत वकील राहुल आडाव यांनी न्यायालयाबाहेर आंदोलन केले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

(walmik karad lawyer rahul adhav) बीड : सर्वात महत्त्वाचा विषय आहे की आण्णावर (वाल्मिक कराड) खोटे गुन्हे दाखल झाले असतील, अशा प्रकारे कुणी स्टंटबाजी करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. खपवून घेणार नाही. अहो कोण हे टक्केवारीवाले, असं म्हणत वकील राहुल आडाव यांनी बीड न्यायालयाबाहेर आंदोलन केले. सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला अखेर 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बीड न्यायालयातील या सुनावणीनंतर पोलिसांनी आरोपी वाल्मिक कराडला व्हॅनमधून जेलच्या दिशेने नेलं. त्यावेळी बीड न्यायालयाबाहेर वाल्मिक कराडच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली आणि न्यायालयाच्या निर्णयाचा निषेध केला. त्यानंतर बीड न्यायालयाबाहेर वकील राहुल आडाव यांनी देखील जोरदार घोषणाबाजी केली आणि वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पोलिसांनी आंदोलकांसह वकीलांना पांगवण्याचा प्रयत्न केला. (walmik karad lawyer rahul adhav angry after court hearing)

नेमकं काय म्हणाले वकील राहुल आडाव ?

“वाल्मिक कराडवरील खोटे गुन्हे मागे घ्या. तुम्ही कशाप्रकारे कायदा-सुव्यवस्था राखतात हे आम्हाला माहीत आहे. वकील राहुल आडाव माझं नावं आहे. संतोष देशमुख यांनी न्याय मिळाला पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे. पण संतोष देशमुखांना 100 टक्के न्याय मिळाला पाहिजे. परंतू अशी स्टंटबाजी करत असाल तर आम्ही सहन करणार नाही. शेवटी कायद्याच्या पलिकडे आम्ही माणूस आहोत. शेवटी माणसातला माणूस म्हणून आम्ही वाल्मिक अण्णाकडे पाहत आहोत. त्यामुळे अण्णावरील खोटे गुन्हे मागे घ्या”, असं म्हणत वकील राहुल आडाव यांनी बीड न्यायालयाबाहेर आंदोलन केले.

“मी एक वकील आहे. भारतीय संविधानाने मला माझी भूमिका मांडण्याचा अधिकार दिला आहे. सर्वात महत्त्वाचा विषय आहे. आदरणीय आण्णावर (वाल्मिक कराड) खोटे गुन्हे दाखल झाले असतील. अशा प्रकारे कुणी स्टंटबाजी करत असेल तर ते आम्ही कदापि सहन करणार नाही. खपवून घेणार नाही. अहो कोण हे टक्केवारीवाले. कुणाला किती टक्केवारी मिळते ते आम्हाला माहिती आहे”, असेही वकील म्हणाले.

“मला न्यायालयाची मर्यादा माहिती आहे. पण त्या सुद्धा एक वकील आहेत. मला नाव सांगता येणार नाही. घोषणाबाजी करणाऱ्या त्यादेखील वकील आहेत. एखादी बाजू मांडत असताना स्टंटबाजी करणार असाल तर ते सहन होणार नाही. संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे. पण त्याचबरोबर जे दंगली घडून आणण्याचा प्रयत्न करत असतील त्यांना आम्ही माफ करणार नाही. कधीच सहन करणार नाही. मी मीडियाच्या माध्यमातून आवाहन करतो, जे काही आण्णावर खोटे गुन्हे दाखल झाले आहेत ते मागे घ्यावेत. या स्टंटबाजी करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत”, असेही वाल्मिक कराडचे वकील राहुल आडाव यावेळी म्हणाले.


हेही वाचा – Hema Pimpale : देवेंद्रजी बीडमधील कायदा-सुव्यवस्था सुधारा; शरद पवारांच्या प्रवक्त्या हेमा पिपंळेंचा संताप



Source link

Comments are closed.