Nash Clinic at KEM Hospital for treatment of fatty liver disease


मुंबई (मारुती मोरे) : ज्यांचे पोट मोठे आहे किंवा लठ्ठपणा आहे आणि ज्यांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त आहे, त्यांनी वेळीच उपचार घेऊन वाढलेल्या पोटाची चरबी आणि वजन नियंत्रणात न ठेवल्यास त्यांना ‘फॅटी लिव्हर’सारखा गंभीर आजार होण्याचा धोका संभवतो. विशेषतः सध्या या आजाराची लक्षणे तरुणांमध्ये जास्त दिसून येत आहेत. त्यामुळे मुंबईत महापालिकेच्या केईएम रुग्णालयात हा आजार बरा करण्यासाठी विशेष ‘नॅश क्लिनिक’ सुरू करण्यात येणार आहे. (Nash Clinic at KEM Hospital for treatment of fatty liver disease)

‘फॅटी लिव्हर’मुळे कॅन्सर, हृदयविकारसारखा गंभीर आजार आणि किडनी खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. या आजाराला टाळण्यासाठी किंवा हा आजार बरा होण्यासाठी मुंबईत महापालिकेच्या केईएम रुग्णालयात 20 जानेवारीपासून विशेष ‘नॅश क्लिनिक’ सुरू करण्यात येणार आहे. यासाठी सुपर स्टार बिग बी अमिताभ बच्चन यांची ‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणून काम पाहणार असून त्यांच्याहस्ते ‘नॅश क्लिनिक’ चा शुभारंभ करण्यात येणार आहे. यासंदर्भातील माहिती, केईएम रुग्णालयाचा अधिष्ठाता संगीता रावत, तज्ज्ञ डॉ. अरुण वैद्य यांनी दिली.

हेही वाचा – BMC : कर्नाक पुलाचा दुसरा गर्डर महापालिका हद्दीत सरकविण्याचे काम पूर्ण

मुंबई महापालिकेच्या प्रमुख रुग्णालयांपैकी एक केईएम रुग्णालयाला शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने, रुग्णालयात विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने, केईएम रुग्णालय प्रशासनाकडून माहिती देण्यात आली.
हल्लीच्या मोबाइल, संगणक युगात तरुण पिढीचे खानपान, राहणीमान, सवयी यात खूपसे बदल झाले आहेत. चायनीज फूड, नॉन व्हेज, तेलकट, मसालेदार आणि गोड खाद्यपदार्थ आदींचे सेवन वाढले आहे. अवेळी झोपणे, आळसपणा, व्यायाम न करणे, आरामदायी प्रवास, तासनतास एकाच ठिकाणी बसून राहणे, शरीराची अपेक्षित हालचाल न करणे आदी सर्व कारणांमुळे हल्लीच्या तरुण पिढीमध्ये पोटाचा घेर वाढणे, चरबी वाढणे, लठ्ठपणा येणे, वजन वाढणे यामुळे त्यांना
‘फॅटी लिव्हर’सारख्या आजाराने ग्रासल्याचे निदर्शनास येते. किमान 100 रुग्णांपैकी 10 ते 20 जणांमध्ये हल्ली हा ‘फॅटी लिव्हर’ आजार असल्याचे निदर्शनास येत असल्याची धक्कादायक माहिती केईएम रुग्णालयाचा अधिष्ठाता संगीता रावत, तज्ज्ञ डॉ. अरुण वैद्य यांनी दिली.

अमिताभ बच्चन यांच्यामाध्यमातून आजाराबाबत जनजागृती

दरम्यान, अमिताभ बच्चन हे प्रामुख्याने ‘नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसिज’ या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी सदिच्छादूत (ब्रॅण्ड एम्बेसेडर) म्हणून कार्यरत असणार आहेत. नॉन-अल्कोहोलिक स्टीटोहेपेटायटिस या आजारामध्ये ‘फॅटी लिव्हर’मुळे रुग्णाला सोरायसिस होऊ शकतो. आधुनिक जीवनशैलीमुळे तरूणाईत वाढणाऱ्या या आजारासाठी मुंबई महापालिका क्षेत्रातील पहिल्या बाह्य रूग्ण विभागाची सुरूवात केईएम रूग्णालयात करण्यात येणार आहे.

हेही वाचा – मोदींकडून महायुतीच्या आमदारांना मार्गदर्शन, गावागावात डब्बा पार्टी घेण्याचा दिला सल्ला


Edited By Rohit Patil



Source link

Comments are closed.