A psychiatrist in Nagpur sexually abused many women
नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे काऊन्सिलिंगसाठी येणाऱ्या शेकडो महिला, मुली आणि तरूणींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. महत्त्वाचे या कृत्यात त्याची पत्नी त्याला साथ देत होती.
नागपूर : अश्लील फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून ब्लॅकमेल करून शारीरिक संबंध ठेवल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र नागपूर शहरातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. हुडकेश्वर परिसरात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीने त्याच्याकडे काऊन्सिलिंगसाठी येणाऱ्या शेकडो महिला, मुली आणि तरूणींचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. याप्रकरणी हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याच्या पत्नीलाही सहआरोपी करण्यात आले आहे. तसेच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी नागपूर पोलीस आयुक्तांनी विशेष टीम तयार केली आहे. (A psychiatrist in Nagpur sexually abused many women)
मिळालेल्या माहितीनुसार, 47 वर्षीय आरोपी असलेला मानसोपचार तज्ज्ञ हा नागपूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून काम करत होता. तो महिला, मुली आणि तरूणींचे अश्लील फोटो काढून व व्हिडीओ तयार करून त्यांना ब्लॅकमेल करायचा आणि वारंवार त्यांच्याशी शारीरिक संबंध ठेवायचा. मागील 7 ते 8 वर्षांपासून त्याचे हे कारनामे सुरू होते. गेल्या वर्षी नोव्हेंबर आरोपी मानसोपचार तज्ज्ञाने दहा वर्षांपूर्वी त्याच्याकडे येणाऱ्या एका तरुणीला तिचे त्या काळचे काही फोटो पाठवून ब्लॅकमेल करणे सुरू केले होते. मानसोपचार तज्ज्ञाच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून महिलेने अखेर पोलिसांकडून तक्रार दाखल केली. यानंतर आणखी तीन पीडित मुलींनी आणि महिलांनी आरोपी मानसोपचार तज्ज्ञाविरोधात हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर आरोपीला अटक करण्यात आली असून सध्या तो तुरुंगात आहे.
हेही वाचा – Breaking : वाल्मिक कराडला सात दिवसांची पोलीस कोठडी; एसआयटीने मांडले 10 मुद्दे, कोर्टात काय-काय झालं
पत्नीला केले सहआरोपी
दरम्यान, पोलिसांनी आरोपी मानसोपचार तज्ज्ञाला अटक केल्यानंतर त्याचा कंप्यूटर जप्त केला. यावेळी त्याच्या कंप्यूटरमध्ये अनेक अनेक महिलांचे फोटो आणि व्हिडीओ आढळून आले. धक्कादाक म्हणजे आरोपी आरोपी मानसोपचार तज्ज्ञ हा ट्रेंड कौन्सिलर असल्याने तो शाळेतील मुलांना एज्युकेशन आणि करियर विषयी कौंसलिंग करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आरोपी मानसोपचार तज्ज्ञाने आजवर अनेक तरुणी आणि अल्पवयीन मुलींसोबत गैरकृत्य केले असावे असा पोलिसांचा अंदाज आहे. तसेच आरोपीच्या पत्नीलाही त्याच्या या कृत्याची माहिती होती. मात्र ती गप्प राहून आपल्या पतीला साथ देत होती. त्यामुळे पोलिसांनी आरोपीच्या पत्नीला सहआरोपी करून तिच्यावरही गुन्हा दाखल केला आहे. मात्र त्याची पत्नी फरार असल्यामुळे पोलिसांकडून तिचा शोध घेण्यात येत आहे.
हेही वाचा – बुलढाण्यानंतर आता वर्धा जिल्ह्यातील जलस्रोतांमध्ये आढळले नायट्रेट; 7 गावं डेंजर झोनमध्ये
Comments are closed.