Dhananjay Munde not included in NCPs star campaigner list for Delhi Assembly elections 2025


दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जणांची स्टार प्रचारक म्हणून घोषणा केली आहे. मात्र या यादीतून पक्षाने धनंजय मुंडे यांना वगळले आहे.

नवी दिल्ली : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकवर्तीय वाल्मीक कराड हा पोलिसांना शरण आला आहे. यानंतर आता वाल्मीक कराडवर या प्रकरणी मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. मात्र संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणात वाल्मीक कराडचे नाव समोर आल्यापासून भाजपा आमदार सुरेश धस यांच्यासह विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होताना दिसत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. असे असले तरी धनंजय मुंडे यांना मोदींच्या दौऱ्यापासून दूर ठेवण्यात आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा होती. यानंतर आता दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्टार प्रचारकाच्या यादीतून धनंजय मुंडे यांचे नाव वगळले आहे. (Dhananjay Munde not included in NCPs star campaigner list for Delhi Assembly elections 2025)

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आतापर्यंत 11 उमेदवार जाहीर केले आहे. अशातच आता पक्षाने या उमेदवारांच्या प्रचारासाठी 20 जणांची स्टार प्रचारक म्हणून घोषणा केली आहे. यात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे अध्यक्ष अजित पवार, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, राष्ट्रीय सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, पार्थ पवार, माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते पाटील, राष्ट्रीय प्रवक्ते ब्रिजमोहन श्रीवास्तव, अविनाश आदीक, संजय प्रजापती, युवक आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, विद्यार्थी आघाडीचे अध्यक्ष चैतन्य मानकर आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्रसिंह यांना संधी दिली आहे. मात्र या यादीतून मंत्री धनंजय मुंडे आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना वगळण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

हेही वाचा – Arvind Kejriwal : सैफ अली खानवरील हल्ल्यानंतर केजरीवालांनी साधला भाजपावर निशाणा, म्हणाले –

अजित पवार वगळता एकाही मंत्र्याचे नाव नाही

दरम्यान, दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया 17 जानेवारी सुरू होईल. यानंतर  उमेदवारांच्या अर्जांची छाननी 18 जानेवारीला झाल्यानंतर 20 जानेवारीपर्यंत उमेदवारांना आपले उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे. त्यानंतर दिल्ली विधानसभेतील 70 जागांसाठी पुढील महिन्यात 5 फेब्रुवारीला मतदान होणार असून 8 फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून स्टार प्रचारकाची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे एकूण नऊ मंत्री आहेत, ज्यात आठ कॅबिनेट मंत्री आणि एक राज्यमंत्री आहे. मात्र असं असतानाही दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या स्टार प्रचारकांच्या यादीत अजित पवार वगळता एकाही मंत्र्याचे नाव नाही.

हेही वाचा – Congress Vs Bjp : पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेसचे दोन बडे नेते भाजपच्या मार्गावर; मंत्र्याकडून फिल्डिंग, पण…



Source link

Comments are closed.