आरसीबीचा 'फ्लाइंग मॅन'! हवेत उडी मारून घेतला अद्भूत झेल; व्हायरल VIDEO पाहा

सध्या जारी विजय हजारे ट्रॉफीमध्ये एकामागून एक आश्चर्यकारक गोष्टी घडत आहेत. एकीकडे करुण नायर 752 च्या सरासरीनं फलंदाजी करतोय, तर आता विदर्भाकडून खेळणाऱ्या यष्टीरक्षक जितेश शर्मानं असा झेल घेतला की तुम्ही त्याला ‘फ्लाइंग मॅन’ म्हणण्यापासून स्वतःला रोखू शकणार नाही.

जितेशच्या कॅचचा व्हिडिओ बीसीसीआयनं शेअर केला, जो सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे. जितेश शर्माला आयपीएल 2025 साठी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं खरेदी केलं आहे. जितेशच्या या झेलवर आरसीबीनंही प्रतिक्रिया दिली. तुम्ही त्याच्या झेलचा व्हिडिओ येथे पाहू शकता.

विजय हजारे ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना विदर्भ आणि महाराष्ट्र यांच्यात खेळला जात आहे. त्याच सामन्यात जितेशनं एक शानदार झेल घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. महाराष्ट्राचा कर्णधार ऋतुराज गायकवाड जितेशच्या झेलद्वारे पॅव्हेलियनमध्ये परतला. गायकवाडला 13 चेंडूत 1 चौकारासह फक्त 7 धावा करता आल्या.

जितेशच्या कॅचबद्दल बोलायचं झालं तर, ऋतुराज गायकवाडनं वेगवान गोलंदाज दर्शन नळकांडेच्या चेंडूवर पुल शॉट खेळण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू त्याच्या बॅटच्या वरच्या भागात आदळला आणि हवेत खूप उंच गेला. चेंडू वर जात असल्याचं पाहून जितेश शर्मानं बराच दूर गेला आणि नंतर चेंडू जवळ येत असल्याचं पाहून त्यानं एक लांब डाईव्ह घेतला आणि चेंडू पकडला. जितेशचा हा झेल खरोखरच पाहण्यासारखा आहे.

उपांत्य सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, महाराष्ट्रानं नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना विदर्भानं 50 षटकांत तीन गडी गमावून 380 धावा केल्या. ध्रुव शोरी आणि यश राठोड यांनी विदर्भासाठी शतकी खेळी केली. ध्रुवनं 14 चौकार आणि 1 षटकारासह 114 धावा केल्या आणि यशनं 14 चौकार आणि 1 षटकारासह 116 धावा केल्या. याशिवाय कर्णधार करुण नायरनं आक्रमक फलंदाजी करत 44 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 88 धावा केल्या.

हेही वाचा –

अविश्वसनीय! वनडे क्रिकेटमध्ये या भारतीय फलंदाजाची तीन आकडी सरासरी, आता तरी संघात संधी मिळेल का?
जसप्रीत बुमराहनं घेतला फेक न्यूज पसरवणाऱ्यांचा समाचार, फिटनेसच्या अफवांना थेट उत्तर
प्रजासत्ताक बॉक्स क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण माहिती

Comments are closed.