Container hits 15 vehicles on Chakan-Shikrapur highway in Pune
पुण्यातील चाकण-शिक्रापूर महामार्गावर भरधाव कंटेनरने 15 वाहनांना धडक दिली. यात पोलीस वाहनाचाही समावेश होता. संतापलेल्या नागरिकांनी चालकाला पकडून बेदम चोप दिला. यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कारवाई करत आहेत.
Pune Accident : गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होताना दिसत आहे. धक्कादायक म्हणजे अपघात झाल्यावर वाहन चालक पळून जातात. पुण्यातील चाकण-शिक्रापूर महामार्गावरही अशीच घटना समोर आली आहे. भरधाव कंटेनरने 15 वाहनांना धडक दिली. यात पोलीस वाहनाचाही समावेश होता. संतापलेल्या नागरिकांनी चालकाला पकडून बेदम चोप दिला. यानंतर पोलिसांनी चालकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर कारवाई करत आहेत. या अपघातात चार जण जखमी झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. (Container hits 15 vehicles on Chakan-Shikrapur highway in Pune)
चाकण-शिक्रापूर महामार्गावरील अपघाताची सुरुवात चाकणच्या माणिक चौकातून झाली. कंटेनर चालकाने सुरुवातीला तीन महिलांना उडवले. यानंतर त्याने भीतीपोटी भरधाव वेगाने कंटेनर पळवला. यानंतर काही अंतरावर कंटेनर चालकाने एका मुलीच्या पायावरून गाडी नेली. नागरिकांनी आरडाओरड केल्यानंतर चाकण पोलिसांनी कंटेनर चालकाचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्यामुळे कंटेनर चालकाने गाडीचा वेग वाढवला आणि वाटेत येणाऱ्या प्रत्येक वाहनांना तो उडवत पुढे जात होता.
हेही वाचा – माणुसकीला काळिमा फासणारी; अपघातग्रस्ताला मदत न करता चोरांचा बाईक घेऊन पोबारा
चाकण पोलिसांनी शिक्रापूर पोलिसांची संपर्क साधत त्यांना कंटेनरबाबत माहिती दिली. यानंतर शिक्रापूर पोलिसांनी कंटनरला रोखण्यासाठी त्यांची गाडी रस्त्याच्या मधोमध उभी केली. मात्र भरधाव वेगात असलेल्या कंटेनरने शिक्रापूर पोलिसांच्या गाडीला धडक दिली. यात ट्रॅफिक वॉर्डन किरकोळ जखमी झाले. यानंतर पोलिसांनी चाकण ते जातेगाव असा वीस किलोमीटर अंतरापर्यंत कंटेनर चालकाचा पाठलाग केला.
या काळात कंटेनर चालकाने चाकण, रासे, शेलगाव, पिंपळगाव आणि चौफुला या ठिकाणी अनेक वाहनांना धडक दिली. या अपघाता चार जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. शिक्रापूर हद्दीत अपघातानंतर महामार्गावरून पळून जाणाऱ्या कंटेनर चालकाला स्थानिक नागरिकांनी पाठलाग करून पकडले. यानंतर त्याला बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले. या थरारक घटनेचा व्हिडीओ आता समोर आला आहे.
हेही वाचा – MoneyEdge Group Scam : टोरेसनंतर दुसरा आर्थिक घोटाळा, गुंतवणूकदारांचे पैसे बुडवल्याने दोन संचालकांना अटक
Comments are closed.