भारतीय संघासाठी आनंदाची बातमी! तीन महिन्यानंतर मैदानावर परतला स्टार खेळाडू

भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज कुलदीप यादवनं बुधवारी सोशल मीडियावर गोलंदाजीच्या सरावाचा एक व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो लाल चेंडूनं सराव करताना दिसत आहे. कुलदीप या व्हिडिओत पूर्ण तंदुरुस्त दिसत आहे.

ही भारतीय संघासाठी आनंदाची बातमी आहे. लेग स्पिनर कुलदीप यादव कंबरेच्या दुखापतीमुळे बऱ्याच काळापासून भारतीय संघाबाहेर आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ रविवारी जाहीर होईल. त्याआधी कुलदीपनं गोलंदाजी सुरू केली. त्यामुळे त्याच्या पुनरागमनाच्या आशा वाढल्या आहेत.

भारतीय संघ 22 जानेवारीपासून इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची टी20 मालिका आणि त्यानंतर एकदिवसीय मालिका खेळणार आहे. कुलदीप यादवला टी20 मालिकेसाठी संघात स्थान मिळू शकलं नसलं तरी तो एकदिवसीय मालिकेत पुनरागमन करू शकतो. गेल्या वर्षी बेंगळुरूमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान कंबरेला दुखापत झालेल्या कुलदीपनं इंस्टाग्रामवर 45 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला, ज्यामध्ये तो नेटमध्ये गोलंदाजी करत आहे.

लेग स्पिनर कुलदीप यादवनं ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत भारतासाठी शेवटचा सामना खेळला होता. पुढील महिन्यात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या दौऱ्यात भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच टी20 आणि 3 एकदिवसीय सामने खेळेले जातील.

कुलदीपची भारताच्या टी20 संघात निवड झालेली नाही, पण तो येत्या काही दिवसांत फिटनेस टेस्ट देईल ज्यामुळे एकदिवसीय मालिका आणि चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्याची उपलब्धता निश्चित होईल. इंग्लंडविरुद्धची एकदिवसीय मालिका 22 जानेवारीपासून सुरू होईल, तर भारत 20 फेब्रुवारीपासून चॅम्पियन्स ट्रॉफीमधील पहिला सामना खेळणार आहे. जर कुलदीप उपलब्ध नसेल तर रवी बिश्नोई किंवा वरुण चक्रवर्ती यांना संधी मिळू शकते.

हेही वाचा –

रिषभ पंत रणजीमध्ये करणार दिल्लीचं नेतृत्व, कोहली खेळणार की नाही?
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी टीम इंडियाला मिळणार नवा प्रशिक्षक? बीसीसीआय मोठा बदल करण्याच्या तयारीत
कोण बनणार भारताचा पुढील बॅटिंग कोच? सेहवागसह या माजी खेळाडूंचे नावं चर्चेत

Comments are closed.