प्रतीक्षा संपली..! स्टार गोलंदाज टीम इंडियामध्ये सामील होण्यास तयार; शेअर केला खास व्हिडिओ
एकदिवसीय विश्वचषक 2023 पासून दुखापतींशी झुंजणारा भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी अखेर टीम इंडियामध्ये पुनरागमन करणार आहे. 14 महिन्यांनंतर तो पुन्हा एकदा टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळताना दिसणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या आगामी 5 सामन्यांच्या टी20 मालिकेसाठी शमीची निवड झाली आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले तर हा वेगवान गोलंदाज चॅम्पियन्स ट्रॉफीसह इंग्लिश संघाविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत चांगली कामगिरी करताना दिसेल. शमी देखील संघात सामील होण्यासाठी खूप उत्सुक आहे. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याने लिहिले आहे की‘प्रतीक्षा संपली!’ मॅच मोड चालू आहे. मी पुन्हा टीम इंडियामध्ये सामील होण्याची तयारी करत आहे.
या व्हिडिओमध्ये शमी त्याचे अनेक बूट साफ करताना दिसत आहे. फलंदाजाच्या किट बॅगमध्ये हेल्मेट, हातमोजे आणि बॅट सारख्या वस्तू असतात, तर गोलंदाज त्याच्या किट बॅगमध्ये फक्त चेंडू आणि शूज असतात. शमीच्या किट बॅगमध्ये सुमारे एक डझन शूज दिसत आहेत.
मोहम्मद शमी 2023च्या विश्वचषकातही दुखापतीसह खेळला होता. स्पर्धा संपल्यानंतर, त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. परंतु त्याच्या तंदुरुस्तीची समस्या अजूनही कायम होती. बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेत भारताला त्याची उणीव भासली.
तथापि, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीची वैद्यकीय टीम शमीवर बारकाईने लक्ष ठेवून होती. शस्त्रक्रियेनंतर, त्याच्या गुडघ्यात सौम्य सूज आली होती. ज्यामुळे तो नुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला जाऊ शकला नाही. त्या मालिकेत भारताला शमीची खूप उणीव भासली.
इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी भारतीय संघ – सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन (विकेटकीपर), अभिषेक शर्मा, टिळक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल (उपकर्णधार), हर्षित राणा, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, वॉशिंग्टन सुंदर, ध्रुव जुरेल (विकेटकीपर)
हेही वाचा-
करुण नायरवर बीसीसीआय विश्वास दाखवणार? टीम इंडियाबाबत मोठी अपडेट समोर
KHO KHO WC; श्रीलंकेचा धुव्वा उडवत टीम इंडियाची सेमीफायनलमध्ये थाटात एंट्री!
रणजी ट्राॅफी न खेळल्यास कोहलीचा इंग्लंडविरूद्धच्या मालिकेतून होणार पत्ता कट?
Comments are closed.