महिला टी20 वर्ल्डकपला आजपासून सुरुवात; जाणून घ्या कधी, कुठे पाहायचा थेट सामना

आयसीसी अंडर-19 महिला टी20 विश्वचषक 2025 ला आज (शनिवार 18 जानेवारी) पासून सुरू होत आहे. ज्यामध्ये 16 संघ सहभागी होत आहेत. भारताला यजमान मलेशिया, श्रीलंका आणि वेस्ट इंडिजसह गट अ मध्ये स्थान देण्यात आले आहे. निकी प्रसादच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ रविवार 19 जानेवारी रोजी क्वालालंपूरमधील बायुमास ओव्हल येथे वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून आपली मोहीम सुरू करेल. भारतीय संघ 2023 मध्ये इंग्लंडला हरवून विजेता बनला आणि गतविजेता म्हणून या स्पर्धेत सहभागी होत आहे.

या स्पर्धेत ग्रुप बी मध्ये इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि अमेरिका यांचा समावेश आहे. गट क मध्ये न्यूझीलंड, नायजेरिया, सामोआ आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. गट ड मध्ये ऑस्ट्रेलिया, बांग्लादेश, नेपाळ आणि स्कॉटलंड यांचा समावेश आहे. ग्रुप स्टेजचे सामने 23 जानेवारीपर्यंत खेळवले जातील. त्यानंतर सुपर सिक्सचे सामने 25 जानेवारीपासून सुरू होतील. यानंतर, उपांत्य फेरीचे सामने 31 जानेवारी रोजी खेळवले जातील आणि त्यानंतर अंतिम सामना 2 फेब्रुवारी रोजी क्वालालंपूरमधील बेयुमास ओव्हल येथे होईल.

या स्पर्धेतील सर्व सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजता आणि दुपारी 12 वाजता सुरू होतील. जिओस्टार यंदाच्या अंडर 19 महिला टी20 विश्वचषकातील सर्व सामने डिजिटल प्लॅटफॉर्मवर लाईव्ह स्ट्रीम करेल. हे सामने स्टार स्पोर्ट्स 2 वर थेट प्रक्षेपित केले जातील. चाहते स्टार स्पोर्ट्स 2 वर सेमीफायनल आणि फायनल सामने देखील पाहू शकतील.

हेही वाचा-

मनु भाकर-डी गुकेशसह इतर चौघांना खेलरत्न अवाॅर्ड, तर स्वप्नील कुसळेसह या 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कार प्रदान
Ranji trophy; मोठ्या मनाचा रिषभ, संघाच्या हितासाठी घेतला मोठा निर्णय!
प्रतीक्षा संपली..! स्टार गोलंदाज टीम इंडियामध्ये सामील होण्यास तयार; शेअर केला खास व्हिडिओ

Comments are closed.