यॉर्करने पायाचा घोटा सुजवणार, तीन – तीन फास्टर बोलर टीम इंडियात, चॅम्पियन ट्रॉफी भारतात आणणार?

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ : चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी (Indian Squad For Champions Trophy) भारताचा 15 खेळाडूंचा संघ जाहीर करण्यात आला आहे. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्त्याने पत्रकार परिषद घेत भारतीय संघाची घोषणा केली. रोहित संघाचा कर्णधार राहणार असून शुभमन गिलची (Shubhman Gill) उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचा पहिला सामना बांगलादेशविरोधात 20 फेब्रुवारी रोजी खेळवण्यात येणार आहे.

दरम्यान, टीम इंडियाने संघात वेगवान गोलंदांना संधी दिली आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला यॉर्करचा सामना करावा लागू शकतो. टीम इंडियाने जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि मोहम्मद शमी या वेगवान गोलंदाजांना संधी दिली आहे. जखमी झालेला मोहम्मद शमी टीम इंडियात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झालाय. दुसरीकडे जसप्रीत बुमराह देखील दुखापतीतून सावरत असल्याचे बोलले जात आहे.

जसप्रीत बुमराहबाबत आगरकर काय म्हणाले?

टीम इंडियाच्या सिलेक्शन टीमचे प्रमुख अजित आगरकर यांनी संघाची (Indian Squad For Champions Trophy) घोषणा केली आहे. मोहम्मद सिराजला संघात स्थान न मिळाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या नितीश कुमार रेड्डीचा संघात समावेश करण्यात आलेला नाही. करुण नायर देखील चर्चेत होता, त्याने विजय हजारे ट्रॉफीमध्ये 8 सामन्यात 752 धावा केल्या आहेत. त्याला देखील पुनरागमन करण्याची संधी देण्यात आलेली नाही. अजित आगरकरने असेही म्हणाले की, जसप्रीत बुमराह अद्याप पूर्णपणे तंदुरुस्त नाही, त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या 3 सामन्यांच्या वनडे मालिकेत त्याच्या जागी हर्षित राणाला संधी देण्यात आली आहे.

टी-20 सामन्यांमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करणारा अर्शदीप सिंग वनडे संघात पुनरागमन करणार आहे. डिसेंबर 2023 मध्ये तो भारताकडून शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. गोलंदाजीची धुरा मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, अक्षर पटेल, रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराह यांच्या खांद्यावर (Indian Squad For Champions Trophy) असणार आहे.

चॅम्पियन ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची घोषणा

1. रोहित शर्मा (कर्णधार)
2. शुभमन गिल (वापर सहाय्यक)
3. विराट कोहली
4. श्रेयस अय्यर
5. केएल राहुल (यष्टीरक्षक)
6. हार्दिक पंड्या
7. अक्षर पटेल
8. वॉशिंग्टन सुंदर
9. कुलदीप यादव
10. जसप्रीत बुमराह
11. मोहम्मद शमी
12. अर्शदीप सिंग
13. यशस्वी जैस्वाल
14. रवींद्र जडेजा
१५. ऋषभ पंत (विकेटकीपर)

इतर महत्त्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

Comments are closed.