मोठी बातमी! वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावरील सुनावणी लांबणीवर, 20 तारखेला होणार पुढची सुनावणी
वाल्मिक कराड : संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा (Walmik Karad) सहभाग असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आल्यानंतर वाल्मिक कराडला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आज वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर केज जिल्हा व सत्र न्यायालयात (Kej Court) सुनावणी पार पडली. वाल्मिक कराडच्या खंडणी प्रकरणातील जामीन अर्जावर येत्या 20 तारखेला केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयाकडे 22 तारखेला पुढील सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती. मात्र, न्यायालयानं सुनावणीसाठी 20 तारीख दिली आहे.
वाल्मिक कराडला खंडणीच्या गुन्ह्यामध्ये केज जिल्हा सत्र न्यायालयाने न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कराडच्या वकिलाने कोर्टामध्ये लगेच जामीन मिळण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाला सीआयडीकडून कोर्टामध्ये आव्हान देण्यात आले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मकोका लागलेल्या करडची सीआयडीला चौकशी करायची आहे. म्हणून वाल्मिक कराडला जामीन देऊ नये, अशी विनंती सीआयडीने कोर्टाकडे केली होती. याच जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा व सत्र न्यायालयासमोर सुनावणी झाली आहे. या सुनावणीत न्यायालयाने 20 तारखेला पुढील सुनावणी घेणार असल्याचे सांगितले आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID कडून कारवाई सुरु
संतोष देशमुख हत्या प्रकरणात CID कडून कारवाई सुरु आहे. यामध्ये सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच या प्रकरणातील आरोपींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करणाऱ्या असल्याचे सांगितलं होतं. त्यानंतर या प्रकरणातील सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, प्रतीक घुले, महेश केदार आणि कृष्णा आंधळे हे सहा आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यामुळे या आरोपींवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, यातील कृष्णा आंधळे हा आरोपी अद्याप फरार आहे.
महत्वाच्या बातम्या:
वाल्मिक कराडवर 302 दाखल करा; धनंजय मुंडेंचा निकटवर्ती असल्याने त्याला VIP ट्रीटमेंट मिळतेय का? आमदार संदीप क्षीरसागरांचा सवाल
अधिक पाहा..
Comments are closed.