Bmc election NCP Sharadchandra pawar party will be contest bmc elections independently
मुंबई – महाविकास आघाडी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वतंत्रपणे लढण्याची शक्यता आहे. शिवेसना ठाकरे गटाने मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका निवडणुकी आम्हाला आमचे बळ एकदा आजमावून पाहयचे असल्याचे म्हटले आहे. तर आता महाविकास आघाडीतील महत्त्वाचा घटकपक्ष शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही मुंबई महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी सुरु केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत पक्ष मुंबई महापालिकेच्या किती जागा लढू शकतो यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई महापालिकेसंबंधी पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. लवकरच मुंबई प्रांताची स्वतंत्र बैठक आयोजित करुन महापालिका निवडणुकीसाठी इच्छूकांच्या मुलाखतीही करण्याचा विचार असल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिकेच्या 50 जागा लढवण्याची तयारी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. पक्षाच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे देखील या बैठकीला उपस्थित होत्या. त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत मुंबई महापालिकेसंबंधी चर्चा केली. पक्ष मुंबई महापालिकेच्या किती जागा लढू शकतो यासंबंधी खासाद सुळे यांनी विचारणा केली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष पालिकेच्या 50 हून अधिक जागा लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे.
मुंबई महापालिका निवडणुकी लढण्याची पक्षाची तयारी आहे. त्यासाठी पक्षाच्या मुंबई प्रांताची बैठक लवकरच बोलावली जाईल, यामध्ये इच्छूकांसोबतही चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
महाविकास आघाडीला धक्का
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर शिवसेना ठाकरे गट आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी याबद्दलचे सुतोवाच केले होते. शिवसेना (ठाकरे ) एकदा मुंबईपासून नागपूर पर्यंत सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढू इच्छिते. पक्षाच्या कार्यकर्त्यांना संधी मिळाली पाहिजे, अशी त्यामागील भूमिका राऊतांनी व्यक्त केली होती.
शिवसेना ठाकरे गटानंतर आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही स्वबळ आजमावण्याची तयारी दाखवली आहे. यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत महाविकास आघाडी अस्तित्वात राहील की नाही, अशी शंका उपस्थित होत आहे.
हेही वाचा : Ajit Pawar : अजितदादांची दिल्लीत वेगळी चूल; विधानसभेसाठी 30 उमेदवारांची यादी जाहीर, 13 मुस्लिम
Comments are closed.