Kitchen Tips : मिक्सर ग्राइंडर असं करा क्लिन
मिक्सर जार कसे स्वच्छ करावे: मिक्सर ग्राइंडरचा वापर विविध पदार्थ तयार करण्यासाठी होतो. वारंवार वापर केल्याने त्यामधून दुर्गंधी येऊ लागते. दुर्गंधी राहिल्यामुळे अन्नाला देखील याचा वास येऊ लागतो. स्वच्छ धुतल्यानंतर जार व्यवस्थित सुकवला गेला नाही तर ओलसरपणामुळे दुर्गंधी येते. लसूण, आलं असे पदार्थ आपण रोज मिक्सरमध्ये ग्राइंड करत असतो त्यामुळे त्याचा वास जारमध्ये तसाच राहतो. आज आपण जाणून घेऊयात मिक्सर ग्राइंडर कसं क्लिन करायचं
लिंबू आणि मीठ
अर्धा लिंबू आणि 1 चमचा मीठ मिक्सरमध्ये घालून थोडेसे फिरवा. त्यानंतर कोमट पाण्याने स्वच्छ धुवा.
बेकिंग सोडा आणि व्हिनेगर
1 चमचा बेकिंग सोड्यायामध्ये 2 चमचे व्हिनेगर मिक्सरमध्ये घालून काही वेळ तसेच ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवून घ्या.
हळद आणि गरम पाणी
1 चमचा हळद कोमटपाण्यामध्ये घालून काही वेळ मिक्सरमध्ये फिरवा.यामुळे बॅक्टेरिया नष्ट होतील आणि दुर्गंधी निघून जाईल.
कॉफी पावडर किंवा भाजलेले तांदूळ
कॉफी पावडर किंवा हलके भाजलेले तांदूळ मिक्सरमध्ये घालून फिरवल्यास वास शोषला जाईल आणि मिक्सरमधील दुर्गंधी सहजपणे घालवता येईल
गरम पाण्याने धुणे
मिक्सरच ग्राइंडर काम झाल्यावर त्वरित धुवून घ्या. नियमितपणे गरम पाण्याने जार स्वच्छ धुतल्याने बॅक्टेरिया आणि वास कमी होतो.
केळीची साल
सर्वात प्रथम केळीचे लहान तुकडे करून घ्या. त्यामध्ये एक चमचा मीठ आणि पाणी घाला. आता हे मिश्रण मिक्सरमध्ये घालून मिक्सर चांगलं ग्राइंड करून घ्या. केळीची साल ही केवळ पोषक तत्वांनी भरपूर असते. परंतु याचा वापर उत्तम क्लिनर म्हणून देखील केला जातो.
व्हिनेगर आणि केळीची साल
जर तुमच्या घरी व्हिनेगर असेल तर तुम्ही व्हिनेगर आणि केळीच्या सालीचा वापर करून मिक्सर ग्राइंड करू शकता. केळीच्या सालीचे तुकडे मिक्सर जारमध्ये घालून १ चमचा पांढरा व्हिनेगर आणि थोडे पाणी घाला. ३० सेकंद ग्राइंड करून घ्या.
या वरील उपयांनी मिक्सर ग्राइंडरमधून दुर्गंध येणार नाही. मिक्सर स्वच्छ देखील राहील.
Comments are closed.