सुदैवाने तो खुनाच्या कटातून निसटला!
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
बांगला देशात रचण्यात आलेल्या माझ्या हत्येच्या कटातून मी भाग्य बलवत्तर म्हणून वाचले, असे प्रतिपादन त्या देशाच्या पदच्युत नेत्या शेख हसीना यांनी केले आहे. सध्या शेख हसीना भारतातील उत्तर प्रदेशात वास्तव्यास आहेत. 5 ऑगस्टला बांगला देशात त्यांच्या विरोधात झालेल्या बंडामुळे त्यांनी तो देश सोडला होता. बांगला देशची राजधानी ढाका सोडण्यापूर्वी आपली हत्या करण्याची योजना विरोधकांनी तयार केली होती. वेळीच देश सोडल्याने हा कट पूर्णत्वास जाऊ शकला नाही. आपल्यासमवेत आपल्या बहिणीचाही जीव घेतला जाणार होता. पण आम्ही दोघीही 25 मिनिटांच्या अंतरात वाचलो. आणखी 25 मिनिटे बांगला देशात थांबलो असतो, तर हत्या निश्चित होती, असे वक्तव्य त्यांनी केले आहे.
बांगला देशात सध्या परिस्थिती गंभीर आहे. तेथील अल्पसंख्याक समाजावर अत्याचार करण्यात येत आहेत. अवामी लीग या आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही त्रास दिला जात आहे. त्यांचा छळ केला जात आहे. 21 ऑगस्टला इस्लामी दहशतवाद्यांनी आपल्या पक्षाच्या कार्यालयावर केलेल्या बाँब हल्ल्यात 24 कार्यकर्त्यांचा बळी गेला. बांगला देशात आता धर्मांधांचे राज्य आले आहे. त्यामुळे या देशाच्या भवितव्याविषयी आपल्याला चिंता वाटते, असेही वक्तव्य त्यांनी केले.
Comments are closed.