पॉश एरियातील श्रीमंती नजरेत भरली; मोहम्मदने सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्लॅन का आखला?

सैफ अली खान चाकू हल्ला : अभिनेता सैफ अली खान घरात शिरून त्याच्यावर जीवघेणा हल्ला करणाऱ्या हल्लेखोराला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या तपासामुळे अखेर तीन दिवसांनी आरोपीला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश आलं आहे. आरोपीचं नाव मोहम्मद शहजाद असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी रविवारी पत्रकार परिषदेत या प्रकरणी अधिक माहिती दिली.

मोहम्मदने सैफच्या घरी चोरीचा प्लॅन का आखला?

सैफ अली खानवर हल्ला  करणारा आरोपी मोहम्मद शरीफ उल इस्लाम शेहजाद हा अनेक महिन्यांपासून बेरोजगार होता. चोरीच्या उद्देशाने तो सैफच्या घरात शिरला. मात्र ते सैफ अली खानचं घर होतं, हे त्याला माहित नव्हतं. हल्यानंतर आरोपी प्रचंड घाबरला होता. त्यामुळे तो पळ काढत होता. सर्वत्र फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्याने पोलिस आपल्याला पकडतील, याची त्याला भीती होती.

सैफचा हल्लेखोर आरोपी बांगलादेशी घुसखोर

सैफ अली खानवर हल्ला करणारा आरोपी बांगलादेशी घुसखोर असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. आरोपीकडे कोणतीही भारतीय कागदपत्रे आढळलेली नाहीत. तो अवैधरित्या भारतात वास्तव्यास असल्याचं तपासात समोर आल आहे. भारतात आल्यानंतर तो एका हॉटेलमध्ये हाऊसकिपिगचं काम करत होता. त्यानंतर कन्स्ट्रक्शन साईटवरही काही दिवस काम केल्याचे तपासात समोर आलं आहे.

पॉश एरियातील श्रीमंती नजरेत भरली अन् चोरीचा प्लॅन का आखला

हल्लेखोर मोहम्मद शहजाद मागील अनेक दिवसांपासून बेरोजगार होता. बेरोजगारीमुळे त्याची उपासमार होत होती. यामुळे त्याने चोरीचा प्लॅन आखला. वांद्रे येथील पॉश एरियातील श्रीमंती पाहून त्याचे डोळे फिरली. उच्चभ्रू वस्तीतील श्रीमंती त्याच्या नजरेत भरली. पॉश एरियात चोरी करुन भरपूर पैसे मिळतील या उद्देशाने तो एका घरात चोरी करण्यासाठी घुसला. मात्र, ते घर अभिनेता सैफ अली खानचं आहे, हे त्याला माहित नव्हतं, असं आरोपीने पोलिस चौकशीत सांगितलं आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :

अधिक पाहा..

Comments are closed.