धक्कादायक! भारतीय क्रिकेटमध्ये हे काय चाललंय? उपकर्णधारावरून बैठकीत गोंधळ
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी शनिवारी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली. बोर्डाच्या दीर्घकाळ चालेलल्या बैठकीनंतर भारतीय क्रिकेट संघाच्या 15 सदस्यीय संघाची निवड करण्यात आली. भारतीय संघाच्या निवडीला बराच वेळ लागला. निवड समिती आणि कर्णधार रोहित शर्मा यांच्यात सुमारे अडीच तासांच्या बैठकीनंतर निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला टीम इंडियाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर उपस्थित होते. संघ निवडण्यासाठी ज्या पद्धतीनं इतका वेळ लागला, ते सर्वांनाच आश्चर्यचकित करणारं होतं. यासाठी इतका वेळ का लागला? आणि असं काय झालं की निवड समिती संघाबाबत एकमत होऊ शकली नाही? याचं उत्तर आता सापडलं आहे.
‘दैनिक जागरण’मध्ये प्रकाशित झालेल्या एका वृत्तात खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. वृत्तानुसार, संघातील बहुतेक खेळाडूंची नावे आधीच निश्चित झाली होती. पण संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षकाबाबत पेच होता. यासाठीची चर्चा सुमारे दोन तासांहून अधिक काळ चालली. या बाबतची धक्कादायक माहिती आता मीडियाच्या हाती लागली आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी शुबमन गिलला भारतीय संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलंय. परंतु उपकर्णधारपदाबाबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांच्यात एकमत नव्हतं. वृत्तांनुसार, गौतम गंभीरला हार्दिक पांड्या उपकर्णधार म्हणून हवा होता. तर रोहित शर्मा आणि अजित आगरकर शुबमन गिलच्या बाजूने होते. येथे नमूद करण्यासारखी बाब म्हणजे, हार्दिक 2023 एकदिवसीय विश्वचषक आणि 2024 टी20 विश्वचषकात भारताचा उपकर्णधार होता.
या तिघांमध्ये आणखी एका बाबीवर एकमत होत नव्हतं, ते म्हणजे संघाचा यष्टीरक्षक. रिपोर्टनुसार, गौतम गंभीरला बॅकअप विकेटकीपर म्हणून संजू सॅमसन हवा होता. तर रोहित शर्मा आणि अजित आगरकरची पसंती रिषभ पंत होता. अखेर पंतची संघात निवड झाली.
हेही वाचा –
करुण नायरची संघात निवड न झाल्याने माजी खेळाडूचा संताप, बीसीसीआयला सुनावले!
हर्टब्रेक! अंतिम सामन्यात करुण नायरच्या संघाचा पराभव, पहिलं विजेतेपद हुकलं
चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये निवड झाल्यानंतर रिषभ पंतला मिळाली आणखी एक मोठी जबाबदारी, लवकरच होईल घोषणा
Comments are closed.