धनंजय मुंडे तुम्ही बीडच्या मातीची बदनामी केली, राजीनामा देण्याची तयारी ठेवा – अंजली दमानिया

धनंजय मुंडे आणि वाल्मीम कराडने बीडची मातीची बदनामी केली अशी टीका सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली. तसेच आता राजीनामा देण्याची तयारी ठेवा असेही दमानिया म्हणाल्या.

एक्सवर पोस्ट करून दमानिया म्हणाल्या की, धनंजय मुंडे, बीडच्या मातीची बदनामी तुम्ही केली. फक्त तम्हीच नाही तर तुमचा वाल्मिक कराड, सुदर्शन घुले आणि विष्णू चाटेनीही बीडच्या मातीची बदनामी केली. संतोष देशमुख सारख्या निष्पाप माणसाच्या निर्घृण हत्येने ….. जाऊद्या बोलवतही नाही

बीड जिल्ह्यातील दहशत संपवून ही माती पुन्हा पवित्र करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. तुमच्याच पक्षातील लोक आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या बीड बद्दल काय म्हणाले वाचा

“राज्यातील एका जिल्ह्यात सुरू असलेल्या प्रकारामुळे राज्यभर पक्ष आणि पक्ष नेतृत्व यांची बदनामी होतं आहे’ ‘याप्रकरणी लवकरात लवकर पक्ष नेतृत्व यांनी पक्षाचा हिताचा विचार करता निर्णय घ्यायला हवा ‘
आगामी निवडणुकांसाठी आशा प्रकारची बदनामी होण पक्ष हिताचे नाही”

आता तुम्ही राजीनामा द्यायची तयारी करा असेही दमानिया म्हणाल्या आहेत.

Comments are closed.