Health- मुलांना दूधाचा ओव्हर डोस नकोच

लहान मुलांच्या शारिरीक विकासासाठी दूध हा महत्नाचा घटक आहे. म्हणूनच बाळाला ६ महिन्यापर्यंत आईचे दूध दिले जातं. त्यानंतर बाळाची भूक वाढत असल्याने डाळ तांदळाची खिमटी यासारख्या पदार्थांबरोबरच इतर पोषक पदार्थ दिले जातात. मात्र काही मुलं दूधच पिणे पसंत करतात. पण वाढत्या वयाबरोबर मुलांची भूकही वाढते. जी फक्त दूध पिऊन भागत नाही. यामुळे पालकांनी मुलांना आवडते म्हणून त्यांना उठसूठ दूध पाजू नये. कारण दूधाच्या या ओव्हरडोसमुळे मुलांना गॅस आणि अपचनाचा त्रास होतो.

तसेच शारिरीक विकासासाठी इतर पोषक घटकही गरजेचे असतात. ज्यांची पूर्तता इतर अन्नपदार्थांतून होते.

यामुळे मुलांना दूध जरी आवडतं असले तरी त्याबरोबर इतर पदार्थ खाण्याची सवय लावावी.

त्यासाठी मुलांना दिवसाला ५०० ते ६०० मिलीलीटरच दूध पिण्यास द्यावे.

जर मुलाला दूध पचतच नसेल तर सोया मिल्क हा उत्तम पर्याय आहे.

तसेच लॅक्टोज फ्री दूधही बाजारात मिळते.

पण त्याचबरोबर मुलांच्या आहारात फळ, भाज्या आणि कडधान्यांचाही समावेश करावा.

त्यामुळे मुलांना आवश्यक फायबर मिळते. गॅस, अपचन समस्या होत नाहीत.

वेगवेगळ्या स्वरुपात शारिरीक वयात इतर घटकांचाही आहारात समावेश करणे गरजेचे असते.

काही मुलांना दूधातील लॅक्टोज पचत नाही. त्यामुळे गॅस अपचन अॅसिडीटी यासारखा त्रास बदल करणे आवश्यक असल्याने

मुलांना पुरेसे पाणीही पाजावे.

पाण्यामुळे पचनक्रिया सुधारते. खाल्लेले अन्न लवकर पचते.

साधारणत १ ते ३ वर्षाच्या बालकाला दिवसातून २-३ कप दूध द्यावे

४ ते ८ वर्षाच्या बालकाला दिवसाला २ ते २.५ कप दूध पाजावे.

९ ते १३ वर्ष वयोगटातील मुलाला दिवसाला ३ कप दूध द्यावे.

१४ ते १८ वर्ष वयोगटातील किशोरवयीन मुलांना दिवसाला ३ कप दूध पुरेसे असते.

 

 

 

 

Comments are closed.