Beed santosh deshmukh murder case Walmik Karad bail hearing on 20 January
बीड : महाराष्ट्रात सध्या बीडमधील मस्साजोगमध्ये झालेल्या सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरण चांगलेच चर्चेत आहे. या प्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांच्या निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड याच्यावर आरोप होत आहेत. काही दिवसांपूर्वी वाल्मिक कराडवर मकोकाअंतर्गत कारवाई करण्यात आली. तसेच, त्याला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शनिवारी (18 जानेवारी) त्याच्या जामीन अर्जावर केज जिल्हा आणि सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. पण यावेळी या प्रकरणी आता 20 जानेवारीला केज जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे. (beed santosh deshmukh murder case Walmik Karad bail hearing on 20 January)
हेही वाचा : Ajit Pawar : राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये चाललं तरी काय? मंत्री धनंजय मुंडेंची शिर्डी अधिवेशनाला दांडी
समोर आलेल्या माहितीनुसार, वाल्मिक कराडच्या वकिलांनी न्यायालयाकडे 22 जानेवारीला पुढील सुनावणी व्हावी अशी मागणी केली होती. पण न्यायालयाने सुनावणीसाठी 20 जानेवारी तारीख दिली आहे. वाल्मिक कराड याचे वकील ॲड. कवडे यांची प्रकृती बरी नसल्यामुळे त्यांनी पुढची तरीखेची मागणी केली होती, असे सांगण्यात आले. सरपंच संतोष देशमुख प्रकरणी आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणामध्ये न्यायालयीन कोठडीत असलेला वाल्मीक कराड यांच्या जामीन अर्जावर केज येथील क स्तर दिवाणी न्यायालयात न्यायाधिश एस. व्ही.पावसकर यांच्या समोर सुनावणी होणार होती.
पण, वकील ॲड. कवडे यांनी न्यायालयासमोर अर्ज सादर केला की, शनिवारी त्यांची प्रकृती ठीक नसल्याने पुढील तारीख वाढवण्यात यावी अशी मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने त्यांचा अर्ज मंजूर केला. पुढची सुनावणी 20 जानेवारीला होणार आहे. या वेळी सरकारी पक्षाचे वकील ॲड. जितेंद्र शिंदे न्यायालयात हजर होते. त्यामुळे केज येथील न्यायालयात वाल्मीक कराड यांच्या जामीन अर्जावर होणारी सुनावणी तूर्त टळली आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून कारवाई सुरू आहे. यामध्ये सुदर्शन घुलेसह 7 आरोपींवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
Comments are closed.