नायजेरिया BRICS भागीदार देश होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नायजेरिया या आफ्रिकेतील देशाचा समावेश ब्रिक्स या संघटनेत भागीदार देश म्हणून करण्यात आला आहे. 2009 मध्ये भारत, ब्राझिल, रशिया आणि चीन या देशांनी मिळून ब्रिक या संघटनेची स्थापना केली होती. नंतर या संघटनेत दक्षिण आफ्रिकेचा समावेश करण्यात आला होता. त्यामुळे संघटनेचे नाव ‘ब्रिक्स’ असे करण्यात आले होते. 2023 मध्ये संघटनेत इराण, संयुक्त अरब अमिरात, इजिप्त आणि इथियोपिया यांचा समावेश भागीदार देश म्हणून करण्यात आला. नंतर मलेशिया, थायलंड, उझबेकिस्तान आणि अझरबैजान हे देश समाविष्ट झाले. सध्या ब्रिक्स संघटनेत बेलारुस, बोलिव्हिया, क्यूबा, कझाकस्थान, मलेशिया, थायलंड, युगांडा आणि उझबेकिस्तान हे देश भागीदार म्हणून समाविष्ट करण्यात आले आहेत. आता या देशांमध्ये नायजेरिया या देशाची भर पडली आहे.
नायजेरिया हा विकसनशील देश असून त्याच्या भागीदार देश म्हणून केलेल्या समावेशामुळे ब्रिक्स ही संघटना अधिक बळकट होण्यास साहाय्य होणार आहे. यामुळे दक्षिण गोलार्धातील देशांचे एकमेकांशी सहकार्य वाढणार आहे. जागतिक दक्षिण सहकार्य संकल्पनेला बळ मिळणार आहे. त्यामुळे नायजेरियाचा समावेश अत्यंत महत्वाचा आहे, अशी भलावण या देशाचा समावेश करताना ब्रिक्सच्या व्यवस्थापनाने केली असून हा समावेश शनिवारपासून करण्यात आला आहे.
Comments are closed.