Saif Ali Khan attack Crime Branch alleged Bandra police for delayed response


मुंबई : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलीस तसेच क्राइम ब्रांचकडून संयुक्तपणे तपास सुरू आहे. अशामध्ये सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचा सध्या शोध सुरू आहे. पण अशामध्ये एक नवा वाद समोर आला आहे. सैफ अली खान हल्ल्याप्रकरणी पोलिसांमध्ये एकमत नसल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी (17 जानेवारी) मुंबई गुन्हे शाखेच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, वांद्रे पोलिसांनी अभिनेता सैफ अली खानवर घुसखोराने केलेल्या हल्ल्याला गांभीर्याने घेतले नाही आणि त्याचे पळून जाण्याचे मार्ग रोखण्यासाठी गुन्हे शाखा आणि सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) सारख्या इतर युनिट्सना तातडीने सूचना दिल्या नाहीत. (Saif Ali Khan attack Crime Branch alleged Bandra police for delayed response)

हेही वाचा : Ajit Pawar : राष्ट्रावादी काँग्रेसमध्ये चाललं तरी काय? मंत्री धनंजय मुंडेंची शिर्डी अधिवेशनाला दांडी 

गुरुवारी (16 जानेवारी) पहाटे 2 वाजताच्या सुमारास झालेल्या हल्ल्यानंतर काही तासांतच तातडीने कारवाई केली असती तर हल्लेखोराला अटक करता आली असती, असे मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. तसेच, वांद्रे पोलिसांचे हे पूर्णपणे अपयश असल्याचे दिसते, ज्यांनी घटनेला गांभीर्याने घेतले नाही आणि जवळच्या इतर पोलिस ठाण्यांना आणि गुन्हे शाखेला घटनेची माहिती मिळताच गुन्हेगाराला पकडण्यासाठी सूचना दिल्या नाहीत,” असे म्हणत मुंबई गुन्हे शाखेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने टीका केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वांद्रे पोलीस ठाण्यातील एक पथक गुरुवारी (16 जानेवारी) पहाटे 4 वाजताच्या सुमारास सैफ अली खानवर उपचार होत असलेल्या लीलावती रुग्णालयात पोहोचले. तर, दुसरे पोलीस पथक हे घटना घडली त्या वांद्रे पश्चिम येथील सद्गुरू शरण इमारतीला भेट दिली.

मुंबई गुन्हे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “वांद्रे पोलिसांनी हल्लेखोराचे सीसीटीव्ही फुटेज मुंबई पोलिसांच्या इतर युनिट्स, जीआरपी, रेल्वे प्रोटेक्शन फोर्स आणि गुन्हे शाखेकडे पाठवले असते, तसेच उपनगरात खासकरून वांद्रे रेल्वे स्थानक आणि इतर ठिकाणी नाकाबंदी करता आली असती.” असे आरोप केले आहे. त्यामुळे आता मुंबई पोलीस आणि मुंबई गुन्हे शाखेमध्ये मोठा वाद समोर आला आहे. अद्याप, या प्रकरणातील हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात आला नसून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.



Source link

Comments are closed.