Photo – शिवसेनेमध्ये इनकमिंग सुरूच
मिरा भाईंदरमधील भाजप, काँग्रेस, शिंदेगट आणि सम्यक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी शिवसेना नेते राजन विचारे, जिल्हाप्रमुख प्रभाकर म्हात्रे आणि इतर पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते.
जोगेश्वरी विधानसभेतील काँग्रेसचे उपतालुका अध्यक्ष मयुर मोरये यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसह आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला.
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मयुर मोरये यांचे पक्षात स्वागत केले.
यावेळी आमदार बाळा नर, जोगेश्वरी विधानसभा संघटक विश्वनाथ सावंत तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
Comments are closed.