26 चेंडूत खेळ खल्लास, भारताच्या वाघीणींच्या जबड्यात वेस्ट इंडिज गुदमरला, टी-20 वर्ल्डकपच्या पहि
भारत महिला विरुद्ध वेस्ट इंडिज महिला: मलेशियाची राजधानी क्वालालंपूरमध्ये होणाऱ्या आयसीसी महिला अंडर-19 वर्ल्ड कपची भारतीय संघाने सुरुवात धुमधडाक्यात केली आहे. ग्रुप अ मध्ये समाविष्ट असलेल्या टीम इंडियाने पहिल्याच सामन्यात वेस्ट इंडिजचा 9 गडी राखून पराभव केला आहे. प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिजला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यांचा संघ 13.2 षटकांत सर्व विकेट गमावून 44 धावा करू शकला. प्रत्युत्तरात, भारताला लक्ष्याचा पाठलाग करण्यात फारशी अडचण आली नाही आणि त्यांनी केवळ 4.2 षटकांत 1 गडी गमावून 47 धावा करून विजय मिळवला. भारतीय गोलंदाज व्हीजे जोशिता हिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले.
वेस्ट इंडिजला अवघ्या 44 धावांत गुंडाळला!
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सुरुवातीपासूनच हा निर्णय योग्य वाटत होता. कॅरिबियन संघाने पहिल्या पाच षटकांतच तीन विकेट गमावल्या. विकेट पुढे पडत राहिल्या आणि धावसंख्या 26/5 झाली. यादरम्यान, अॅस्बी कॅलेंडरने 12 धावा केल्या आणि कर्णधार समारा रामनाथने 3 धावा केल्या, तर नजन्नी कंबरबॅच, जहझारा क्लॅक्सटन आणि ब्रायना हरिचरण यांना त्यांचे खातेही उघडता आले नाही. केनिका कैसरने 15 धावा केल्या आणि ती डावात सर्वाधिक धावा करणारी फलंदाज होती.
इनिंग ब्रेक!
उत्कृष्ट गोलंदाजी कामगिरी 🙌
आमच्या फलंदाजांना 💪
अपडेट्स ▶️ https://t.co/EHIxnF1mFp#TeamIndia | #INDvWI | #U19 विश्वचषक pic.twitter.com/rBT8CyGGJe
— BCCI महिला (@BCCIWomen) 19 जानेवारी 2025
इतर कोणालाही काही खास कामगिरी करता आली नाही त्यामुळे वेस्ट इंडिज संघ 50 धावांचा टप्पाही गाठू शकला नाही. वेस्ट इंडिजच्या डावात पाच फलंदाजांना खातेही उघडता आले नाही. भारतीय संघाकडून पारुनिका सिसोदियाने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या. दरम्यान, व्हीजे जोशिता आणि आयुषी शुक्ला यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
टीम इंडियाने सहज गाठले लक्ष्य
छोट्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारतीय संघाला जास्त संघर्ष करावा लागला नाही. पण, सुरुवात फारशी चांगली झाली नाही. कारण गोंगाडी त्रिशा 4 धावा करून पहिल्याच षटकात बाद झाली. येथून जी कमलिनी आणि सानिका चालके यांच्या जोडीने पाचव्या षटकातच भारताला लक्ष्य गाठून दिले. कमलिनीने 16 धावांची नाबाद खेळी केली, तर सानिकाने 18* धावा केल्या. वेस्ट इंडिजसाठी एकमेव यश जहझारा क्लॅक्सटनने मिळवले.
हे ही वाचा –
अधिक पाहा..
Comments are closed.