‘स्वेट ऑन स्ट्रीट’ सारख्या मेगा स्ट्रीट फेस्टीव्हलच्या माध्यमातून मुंबईतील रस्त्यांवर जनतेला मोकळा श्वास घेता येतो – आदित्य ठाकरे

युवासेना कार्यकारिणी सदस्य अंकीत प्रभू यांच्या पुढाकाराने आयोजित केल्या जाणाऱ्या रहदारीमुक्त रस्त्यावरील ‘स्वेट ऑन स्ट्रीट’ कार्यक्रमाला चिमुरड्यांसह सर्वच वयोगटातील नागरिकांनी हजेरी लावली. दरवर्षी आयोजित करण्यात येत असलेल्या या कार्यक्रमाला यंदा शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी उपस्थिती दर्शवत आपले मनोगत व्यक्त केले.

सलग पाचव्या वर्षी बहुप्रतिक्षित ‘स्वेट ऑन स्ट्रीट’ 5.0 या नव्या रुपासह अपडेटेड व्हर्जन आज दिनांक 19 डिसेंबर रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत आयोजित करण्यात आले.

या कार्यक्रमाला संबोधित करताना आदित्य ठाकरे म्हणाले की, असे मेगा स्ट्रीट फेस्टीव्हल मुंबई मधील गल्ल्या आणि रस्त्यांवर आयोजित करण्यात यावेत जेणेकरून मुंबईतील रस्त्यांवर मुंबईकर जनतेला मोकळा श्वास घेता येईल.

यामध्ये सर्व वयोगटासाठी झुंबा, खेल-ओ-कबड्डी, कमांडोज-एक्स-फॅक्टर, रिंग फुटबॉल, जिम-फिट-मॅनिया, बिग साइज गेम्स, मिस्ट्री एस्केप रूम क्रिकेट, बुल राईड, 360 सेल्फी स्टँड, आर्ट स्टेशन, बॅडमिंटन, कूंग- फू, कराटे, स्केटिंग, बुद्धिबळ, असे वेगवेगळे खेळ, व्यायाम व फिटनेस प्रकार, नृत्य, संगीत, चित्रकला, हस्तकला, कॅनव्हास पेंटिंग, थिएटर वर्कशॉप, योगाची प्रात्यक्षिके, एक्सपिरियंस रूम, ब्रह्मकुमारीचे मानसिक स्वास्थ्य कसे मिळवायचे यावर उपाय आदी कलागुणांना वाव देणारे साठ पेक्षा जास्त उपक्रम उपलब्ध होते.

मुंबईमध्ये कमी झालेली मैदाने, मोकळ्या जागा नसल्यामुळेच मुलांना त्यांना खेळायला आणि त्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळत नाही. हीच बाब लक्षात घेऊन युवासेना, भारतीय विद्यार्थी सेना आणि स्वेट ऑन क्लब यांनी हा उपक्रम येथे राबवला. यावेळी शिवसेना नेते, आमदार सुनिल प्रभु, अनंत (बाळा) नर, महेश सावंत, सचिन अहिर, सुप्रदा फातर्फेकर, साईनाथ दुर्गे, पवन जाधव यांच्यासह सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments are closed.