चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी यशस्वी जयस्वालला भारतीय संघात स्थान का? कर्णधाराने सांगितले कारण
2025च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्राॅफीसाठी (ICC Champions Trophy) भारताने आपला संघ जाहीर केला आहे. त्यामध्ये भारताने युवा प्रतिभावान खेळाडू यशस्वी जयस्वाललाही (Yashasvi Jaiswal) संधी दिली आहे. जयस्वालने आतापर्यंत भारतासाठी कसोटी आणि टी20 फाॅरमॅटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. आता त्याला वनडे सामन्यातही पदार्पण करण्याची संधी मिळू शकते. दरम्यान भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याला भारतीय संघात स्थान का दिले? हे उघड झाले आहे. या प्रकरणावर कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) आपली प्रतिक्रिया दिली आहे.
यशस्वी जयस्वालने भारतासाठी 19 कसोटी आणि 23 टी20 सामने खेळले आहेत. पण त्याला अद्याप वनडे पदार्पणाची संधी मिळालेली नाही. पण आता 2025च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये संधी मिळू शकते. भारतीय संघाचा कर्णधार रोहितने यावर प्रतिक्रिया दिली. जयस्वालला संधी का देण्यात आली हे त्याने सांगितले. रोहित शर्मा म्हणाला की, “यशस्वीची क्षमता लक्षात घेऊन त्याची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.”
जयस्वाल वनडेसाठी सज्ज? 🔥🇮🇳 pic.twitter.com/9x7EI13nom
— राजस्थान रॉयल्स (@rajasthanroyals) 19 जानेवारी 2025
यशस्वी जयस्वालच्या (Yashasvi Jaiswal) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले, तर त्याने भारतासाठी 19 कसोटी आणि 23 टी20 सामने खेळले आहेत. 19 कसोटीच्या 36 डावात फलंदाजी करताना त्याने 1,798 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची फलंदाजी सरासरी 52.88 राहिली आहे. कसोटीत जयस्वालने 10 अर्धशतकांसह 4 शतके आणि 2 द्विशतके झळकावली आहेत. 23 टी20 सामन्यात त्याने 22 डावात फलंदाजी करताना 723 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सरासरी 36.15, तर स्ट्राईक रेट 164.31 राहिला आहे. टी20 मध्ये त्याने 5 अर्धशतकांसह 1 शतक झळकावले आहे. तर सर्वोच्च धावसंख्या 100 आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
भारताचा पुढचा कर्णधार कोण? सुरेश रैनाने सांगितले ‘या’ खेळाडूचे नाव
संजू सॅमसनला चॅम्पियन्स ट्रॉफीतून का वगळण्यात आलं? खरं कारण जाणून घ्या
लज्जास्पद! अवघ्या 23 धावांवर संपूर्ण संघ ऑलआऊट, 6 फलंदाजांना खातंही उघडता आलं नाही
Comments are closed.