IND vs ENG; भारताने जिंकला टाॅस! शमीला वगळले, जाणून घ्या दोन्ही संघांच्या प्लेइंग 11
भारत-इंग्लंड संघातील 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामन (22 जानेवारी) कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने (Suryakumar Yadav) टाॅस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
पहिल्या टी20 सामन्यासाठी दोन्ही संघाच्या प्लेइंग 11-
भारत- अभिषेक शर्मा, संजू सॅमसन(यष्टीरक्षक), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव( कर्णधार), हार्दिक पांड्या, रिंकू सिंह, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, वरुण चक्रवर्ती
इंग्लंड- बेन डकेट, फिलिप साल्ट (यष्टीरक्षक), जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, लियाम लिव्हिंगस्टोन, जेकब बेथेल, जेमी ओव्हरटन, गस अॅटकिन्सन, जोफ्रा आर्चर, आदिल रशीद, मार्क वूड
दोन्ही संघाच्या हेड टू हेड रेकाॅर्डबद्दल बोलायचे झाले, तर दोन्ही संघात आतापर्यंत 24 टी20 सामने खेळले गेले आहेत. त्यामध्ये भारतीय संघाचे वर्चस्व राहिले आहे. भारताने 13 सामन्यात विजय मिळवला आहे, तर इंग्लंडचा संघ 11 सामने जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. दरम्यान आजच्या सामन्यात कोण बाजी मारेल, हे पाहणेदेखील महत्वाचे ठरेल.
महत्त्वाच्या बातम्या-
भारतीय संघाच्या जर्सीवर पाकिस्तानचे नाव असणार की नाही? BCCIच्या सचिवांनी दिले उत्तर
IND vs ENG; पहिलाच टी20 सामना अन् भारतीय खेळाडूंच्या निशाण्यावर 3 मोठे रेकाॅर्ड्स
‘मित्रामुळे भेट झाली, नंतर प्रेमात पडले….’, रिंकू सिंग-प्रिया सरोजची लव्ह स्टोरी खूपच रंजक
Comments are closed.