Amol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले…
Amol Mitkari Baramati| 2-3 टक्के योजनेत भ्रष्टाचार, कोकाटेंच्या वक्तव्यावर मिटकरी म्हणाले…
बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राला अमोल मिटकरी यांनी शिष्टमंडळासह दिली भेट. अनेक मुख्यमंत्री विदर्भातील झाले परंतु शेती संदर्भात कुठलेही काम झालं नसल्याची अमोल मिटकरींची टीका.
राज्य सरकारने मोठा गाजावाजा करत सुरू केलेली, एक रुपयात पीकविमा योजना.. आता घोटाळ्यांच्या आरोपामुळे गाजू लागलीय.. कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी पीकविमा योजनेत भ्रष्टाचार झाल्याची कबुली तर दिलीच.. शिवाय कुठल्याही योजनेत २ ते ४ टक्के भ्रष्टाचार होतो असं धक्कादायक विधानदेखील केलं… भ्रष्टाचार झाल्याचं मान्य करताना, योजना बंद करणार नसल्याचंही ते म्हणाले.. तसंच जर पिक विमा योजनेबाबत काही बदल करायचे असतील तर, त्याचा अभ्यास करू आणि तत्काळ कॅबिनेटमध्ये हा विषय मांडू असंही कृषीमंत्री म्हणाले… यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे..
Comments are closed.