पहिल्या टी-20 सामन्यात सूर्याने जिंकली नाणेफेक! शमीला मिळाली नाही जागा; जाणून घ्या प्लेइंग-11

India vs England 1st T20I Live Cricket Score : सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ 2025 मध्ये पहिल्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडविरुद्ध खेळत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना कोलकात्यातील ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर खेळला जात आहे. गेल्या 6 वर्षात भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकही टी-20 मालिका गमावलेली नाही. टीम इंडियाला शेवटचा 2019 मध्ये घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाकडून टी-20 मध्ये पराभव पत्करावा लागला होता. तेव्हापासून, भारत त्यांच्या घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत अपराजित आहे. भारतीय संघाला त्याच्या घरच्या मैदानावर अजिंक्य ठेवण्याचे आव्हान सूर्याच्या खांद्यावर असेल.

भारत आणि इंग्लंडचे संघ टी-20 मध्ये 24 वेळा आमनेसामने आले आहेत. भारताने 13 सामने जिंकले आहेत, तर इंग्लंडने 11 सामने जिंकले आहेत. भारताने इंग्लंडविरुद्ध घरच्या मैदानावर 11 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात टीम इंडियाने 6 जिंकले आहेत तर इंग्लंडने 5 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. या सामन्यापूर्वी, दोन्ही संघांनी कोलकाता येथे एक टी-20 सामना खेळला होता ज्यामध्ये इंग्लंडने विजय मिळवला होता. हा टी-20 सामना 2011 मध्ये खेळला गेला होता. त्यावेळी इंग्लंडने भारताचा 6 गडी राखून पराभव केला होता.

Comments are closed.