Aditya Thackeray absent from Mumbai City District Planning Committee Meeting
एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मुंबई शहराच्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीचे (DPDC) आयोजन करण्यात आले होते. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या बैठकीला उशिरा आले, तर आदित्य ठाकरे यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे आता वरळीचे आमदार असूनही आदित्य ठाकरे यांनी पाठ फिरवल्यामुळे चर्चा होताना दिसत आहे.
Mumbai City District Planning Committee Meeting : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई आणि ठाण्याचे पालकमंत्रिपद देण्यात आले आहे. यानंतर आज एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई शहराच्या जिल्हा नियोजन विकास समितीच्या बैठकीचे (DPDC) आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला वरळीचे आमदार आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे हेही उपस्थित राहण्याची शक्यता होती. त्यामुळे बैठक वादळी होईल, असे सर्वांनाच वाटले होते. मात्र पालकमंत्री एकनाथ शिंदे स्वत: या बैठकीला उशिरा आले, तर आदित्य ठाकरे यांनी बैठकीकडे पाठ फिरवली. त्यामुळे आता वरळीचे आमदार असूनही आदित्य ठाकरे यांनी पाठ फिरवल्यामुळे चर्चा होताना दिसत आहे. (Aditya Thackeray absent from Mumbai City District Planning Committee Meeting)
डीपीडीसी बैठकीसाठी प्रशासनाकडून दुपारी 1 ची वेळ देण्यात आली होती. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वत: बैठकीला उशिरा आले. इतर कार्यक्रमांना उपस्थित राहिल्याने एकनाथ शिंदे यांना बैठकीला पोहचण्यास उशिरा झाला. त्यामुळे प्रत्यक्षात बैठक 4 वाजता सुरू झाली. या बैठकीला मुंबई शहरातील लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हजर होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी उशीर झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. मात्र आमदार आदित्य ठाकरे यांनी या बैठकीला पाठ फिरवल्याचे पाहायला मिळाले. कार्यक्रम आणि बैठका आधीच ठरल्या असल्याने आदित्य ठाकरे नियोजन समितीच्या बैठकीला उपस्थित राहू शकले नाहीत.
हेही वाचा – Waqf Bill : वक्फ विधेयकाला विरोध; फडणवीस म्हणतात, अल्पसंख्याक लांगूलचालनाची परंपरा ठाकरेंनी अंगीकारली
आमदारांनी तक्रारीचा वाचला पाढा
दरम्यान, बैठकीला सुरुवात झाल्यानंतर लोकप्रतिनिधींनी 690 कोटी रुपयांच्या विकासनिधीची मागणी केली. विकास प्रकल्प आणि पायाभूत सुविधांसाठी आमदारांनी निधी मागितला. यात झोपडपट्टी विकासासाठी 225 कोटी, रुग्णालयांसाठी 85 कोटी, पोलीस वसाहती आणि स्थानकांसाठी 63 कोटी, गडकिल्ले विकासासाठी 20 कोटी आणि कुलाबा कॉजवेच्या विकासासाठी 2 कोटी रुपयांचा निधी मागण्यात आल्याचे समजते. तसेच धारवीच्या लोकप्रतिनिधी असलेल्या काँग्रेस आमदार ज्योती गायकवाड यांनी बैठकीत सायन पुलाचा प्रश्न मांडला. पुलाचे काम अतिशय धीम्या गतीने सुरू असल्याची तक्रार त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा – Raj Thackeray : भ्रष्टाचाऱ्यांशी हातमिळवणी करण्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी भाजपावर साधला निशाणा
Comments are closed.