“हा निर्णय हेड कोच…”, वादग्रस्त 'कन्कशन सबस्टिट्यूट' नियमावर हर्षित राणाची मोठी प्रतिक्रिया
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा टी20 सामना शुक्रवारी 31 जानेवारी रोजी पुण्यात खेळला गेला. भारतीय डावाच्या शेवटच्या षटकात, शिवम दुबेच्या हेल्मेटला चेंडू लागला. ज्यामुळे तो क्षेत्ररक्षण करण्यासाठी मैदानात आला नाही. हर्षित राणाला त्याचा कन्कशन पर्याय म्हणून संधी मिळाली. त्यानं त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात त्याने 3 बळी घेत शानदार कामगिरी केली.
सामन्यानंतर, हर्षित राणाने कन्कशन सबस्टिट्यूटमागील सूत्रधार उघड केला आणि म्हणाला, “हे अजूनही माझ्यासाठी स्वप्नवत पदार्पण आहे. जेव्हा दुबे परत आला (डगआउटवर), दोन षटकांनंतर सरांनी (गाैतम गंभीर) मला सांगितले की मी कन्कशन पर्याय म्हणून खेळेन. हे फक्त या मालिकेसाठी नाही; मी बऱ्याच काळापासून संधीची वाट पाहत होतो आणि मला हे सिद्ध करायचे होते की मी येथे खेळण्यास पात्र आहे. मी आयपीएलमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. भारतासाठीही मला तेच करायचे आहे.”
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी केल्यानंतर, टीम इंडियाने शिवम दुबे आणि हार्दिक पांड्याच्या अर्धशतकांच्या मदतीने 181 धावा केल्या. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. कर्णधार सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांना खातेही उघडता आले नाही. तर संजू सॅमसननेही 1 धाव केली. एकेकाळी भारताने 79 धावांवर 5 विकेट गमावल्या होत्या. त्यानंतर हार्दिक आणि दुबे यांनी 53-53 धावांची खेळी खेळली. संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.
182 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात दमदार झाली. पॉवरप्लेमध्ये, संघाने 1 विकेट गमावून 62 धावा केल्या होत्या, पण फिरकीपटू येताच पाहुणा संघ बॅकफूटवर घसरला. सातत्याने विकेट्स गेल्याने इंग्लंड पूर्ण 20 षटकेही खेळू शकला नाही. संपूर्ण संघ 19.4 षटकांत 166 धावांवर आटोपला. शिवम दुबेला त्याच्या शानदार खेळीसाठी सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
हेही वाचा-
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर, 2017 च्या चॅम्पियन संघातील 3 खेळाडूंचा समावेश
IND vs ENG; स्वप्नवत कामगिरी..! पदार्पणाच्या सामन्यात हर्षित राणानंं रचला इतिहास
IND vs ENG; पुण्यात भारतानं इंग्लंडला लोळवलं, पांड्या-दुबेची झंझावती खेळी, मालिका खिश्यात..!
Comments are closed.