रणजी सामन्यात राडा! किंग कोहलीला चाहत्यांनी घेरलं अन्… मैदानात नुसती पळापळ, पाहा व्हायरल Vide

विराट कोहली रणजी ट्रॉफी 2025 : 13 वर्षांनंतर रणजी ट्रॉफीमध्ये पुनरागमन करणार विराट कोहली सतत चर्चेत आहे. दिल्ली आणि रेल्वे यांच्यातील हा सामना अरुण जेटली स्टेडियमवर खेळला जात आहे ज्यामध्ये विराटच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. चाहते त्यांच्या आवडत्या क्रिकेटपटूला पाहण्यासाठी उत्सुक आहेत. सामन्याच्या पहिल्या दिवशी एक चाहता मैदानात घुसला होता, आता आज म्हणजेच शनिवारी सामन्याच्या तिसऱ्या दिवशीही असेच घडले.

सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दिल्ली संघ क्षेत्ररक्षण करत आहे आणि विराट कोहली देखील मैदानात आहे. यावेळी, एक नाही तर तीन चाहते सुरक्षा घेरा तोडून मैदानात घुसले आणि विराटजवळ पोहोचले. या तिघांना पाहून विराट कोहलीही आश्चर्यचकित झाला. पाच मिनिट दिल्ली संघाच्या खेळाडूंनाही काय चालले आहे ते समजत नाही.

तीन चाहत्यांना मैदानात येताना पाहून स्टेडियममध्ये उपस्थित असलेले सुरक्षारक्षक लगेच सक्रिय झाले आणि मैदानात आले. सर्वांनी मिळून तिघांनाही मैदानाबाहेर काढले आणि मग सामना पुन्हा सुरू झाला. पण त्यावेळी मैदानात नुसती पळापळ चालू होती, ज्याचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. या तिघांपैकी 2 जण अल्पवयीन होते आणि एकाने विराट कोहलीच्या पायाला स्पर्शही केला. अशी घटना उघडकीस आल्यानंतर अरुण जेटली यांच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले.

पहिल्या आणि दिसऱ्या दिवशी विराट कोहलीला पाहण्यासाठी स्टेडियम पूर्णपणे खचाखच भरले होते. पहिल्या दिवशी स्टेडियमबाहेर इतके चाहते होते की चेंगराचेंगरी झाली. पहिल्या दिवशी कोहली फलंदाजीला आला नाही. तो दुसऱ्या दिवशी फलंदाजीसाठी आला, पण फक्त सहा धावा करून बाद झाला. हिमांशू सांगवानने त्याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर संपूर्ण मैदान जवळजवळ रिकामे झाले.

खेळाच्या तिसऱ्या दिवशी मैदानावर फारशी गर्दी नव्हती, कदाचित क्रिकेट चाहते कोहलीच्या फलंदाजीची वाट पाहत होते. दुसऱ्या डावात विराट कोहलीच्या फलंदाजीदरम्यान पुन्हा एकदा मैदानावर मोठी गर्दी दिसू शकते.

हे ही वाचा –

ICC Concussion Substitute Rule : जिंकण्यासाठी कोच गौतम गंभीर खरंच खालच्या स्तरावर गेला का? जाणून घ्या काय सांगतो ICC चा कन्कशन नियम

Ranji Trophy 2025 : विराट, रोहित ढेपाळले; पुजारा, रहाणेने लक्ष वेधले, आकडेवारी पाहून तुम्ही व्हाल अचंबित, BCCI किती दिवस करणार अन्याय?

अधिक पाहा..

Comments are closed.