मुंबईकरांनो पाणी जपून वापरा; ‘या’ भागात 5 फेब्रुवारीला पाणीपुरवठा बंद

मुंबईकरांसाठी एक महत्वाची बातमी आहे. मुंबई पूर्ण आणि पश्चिम उपनगरतील पाणीपुरवठा बुधवारी (5 फेब्रुवारी रोजी) तब्बल 30 तासांसाठी बंद राहणार आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत नवीन 2400 मिलीमीटर व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्यासाठी बुधवारी सकाळी 11 वाजता ते गुरुवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत 30 तासांच्या कालावधीसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बुधवार (5 फेब्रुवारी) सकाळी 11 वाजेपासून ते गुरुवार (6 फेब्रुवारी) सायंकाळी 5 वाजेपर्यंत भांडुप, कुर्ला, अंधेरी ते वांद्रे (पूर्व), धारावी आणि दादरमधील काही भागात 30 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पाणीपुरवठा बंद राहणार असल्यानेच मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Comments are closed.