IND vs ENG; पाचव्या सामन्यात या खेळाडूंवर विशेष लक्ष, महान विक्रम रचण्याची संधी

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील पाचवा टी20 सामना आज (02 फेब्रुवारी) मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. भारताने चौथ्या टी20 सामन्यात इंग्लंडचा 15 धावांनी पराभव केला. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत 3-1 अशी आघाडी घेतली. कोलकाता येथे खेळलेला पहिला सामना भारताने सात विकेट्सने जिंकला. तर दुसरा सामना भारताने 2 विकेट्सने जिंकला. तिसऱ्या सामन्यात इंग्लंडने पुनरागमन केले आणि 26 धावांनी विजय मिळवला. तर भारताने चौथा सामना 15 धावांनी जिंकला. पाचव्या सामन्यात तीन भारतीय खेळाडूंना मोठी कामगिरी करण्याची संधी आहे.

भारतीय संघाचा स्टार फिरकी गोलंदाज वरुण चक्रवर्तीने इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या मालिकेत शानदार कामगिरी केली आहे. मालिकेत तो सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. पाचव्या सामन्यादरम्यान, वरुणला द्विपक्षीय टी20 मालिकेत भारतीय गोलंदाजाकडून सर्वाधिक विकेट्स घेण्याचा स्वतःचा विक्रम मोडण्याची संधी आहे. हा विक्रम मोडण्यासाठी त्याला फक्त एका विकेटची आवश्यकता आहे.

वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंग देखील गेल्या काही महिन्यांपासून उत्तम फॉर्ममध्ये आहे. त्याने या मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. वेगवान गोलंदाज अर्शदीपला टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 100 बळी पूर्ण करण्यासाठी एका विकेटची आवश्यकता आहे. जर अर्शदीपने पाचव्या सामन्यात विकेट घेतली तर तो ही कामगिरी करणारा जगातील चौथा सर्वात जलद गोलंदाज बनेल. 53 सामन्यांमध्ये 100 टी20 विकेट्स घेणारा सर्वात जलद गोलंदाज रशीद खान आहे. त्यानंतर संदीप लामिछाने आहे, ज्याने 54 सामन्यांमध्ये 100 विकेट्स घेतल्या आहेत. 63 सामन्यांमध्ये 100 विकेट्ससह वानिंदू हसरंगा तिसऱ्या स्थानावर आहे.

पाचव्या टी20 सामन्यादरम्यान सलामीवीर अभिषेक शर्माला टी20 क्रिकेटमध्ये 3500 धावा पूर्ण करण्याची संधी आहे. तो मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे. अभिषेकला 3500 धावा पूर्ण करण्यासाठी 40 धावांची आवश्यकता आहे. अभिषेक शर्माने इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत 4 सामन्यांमध्ये 144 धावा केल्या आहेत.

हेही वाचा-

2025च्या आयपीएल हंगामात रिंकू सिंहच्या नावावर होणार ‘हे’ 3 खास रेकाॅर्ड
चॅम्पियन्स ट्राॅफीत रोहित-विराट घालणार धुमाकूळ, प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया
शाब्बास..! स्मृती मानधनानं घडवला इतिहास, चौथ्यांदा जिंकला बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार

Comments are closed.