IND vs ENG; पाचव्या टी20 साठी या खेळाडूची एंट्री निश्चित, पाहा टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11

इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी20 मालिकेत भारतीय संघाने 3-1 अशी आघाडी घेतली आहे. आता मालिकेतील शेवटचा आणि पाचवा सामना आज मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना फक्त औपचारिकता आहे. कारण भारतीय संघाने आधीच मालिका जिंकली आहे. अशा परिस्थितीत, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि संघ व्यवस्थापन या सामन्यासाठी बेंच स्ट्रेंथचा वापर करू शकतात. ज्या खेळाडूंना मालिकेत अद्याप संधी मिळालेली नाही. त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये ट्रायल करता येईल.

इंग्लंडविरुद्धच्या टी20 मालिकेत संजू सॅमसनला त्याच्या नावाप्रमाणे कामगिरी करता आलेली नाही. मालिकेतील चार सामन्यांमध्ये त्याला फक्त 35 धावा करता आल्या आहेत. अशा परिस्थितीत त्याला पाचव्या टी20 सामन्यात समाधानकारक कामगिरी करावी लागेल. अभिषेक शर्माने पहिल्या टी20 सामन्यात निश्चितच अर्धशतक झळकावले होते. ज्यात त्याने एकट्याने भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर, त्याने अनेक सामन्यांमध्ये चांगली सुरुवात केली पण ती त्याला मोठ्या डावात रूपांतरित करता आली नाही. तरीही, कर्णधार सूर्या या दोन्ही खेळाडूंवर विश्वास दाखवू शकतो. अशा परिस्थितीत, हे दोन्ही खेळाडू सलामी देताना दिसू शकतात. संजूला विकेटकीपिंगची जबाबदारी दिली जाऊ शकते.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना, तिलक वर्माने दुसऱ्या सामन्यात 72 धावांची शानदार खेळी खेळली. या क्रमांकावर खेळताना तो चांगली कामगिरी करतो. अशा परिस्थितीत त्याला तो तिसऱ्या क्रमांकावर खेळेल. कर्णधार सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. सूर्या गेल्या काही सामन्यांपासून खराब फॉर्मशी झुंजत आहे. अशा परिस्थितीत तो लयीत येण्याचा प्रयत्न करेल. हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग यांनाही प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळू शकते. चौथ्या टी20 सामन्यात दोघांनीही चांगली फलंदाजी केली.

रमनदीप सिंगला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात संधी मिळू शकते. तो अद्याप मालिकेतील कोणत्याही सामन्यात प्लेइंग इलेव्हनचा भाग झालेला नाही. उपकर्णधार अक्षर पटेल खेळणार हे निश्चितच आहे. तो आक्रमक फलंदाजी आणि उत्कृष्ट गोलंदाजी करण्यात पारंगत आहे. त्याच्याशिवाय फिरकी विभागाची जबाबदारी वरुण चक्रवर्ती आणि रवी बिश्नोई यांना दिली जाऊ शकते. या दोन्ही खेळाडूंनी आतापर्यंत मालिकेत उत्कृष्ट कामगिरी दाखवली आहे. अर्शदीप सिंग वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व करताना दिसू शकतो.

पाचव्या टी20 सामन्यासाठी भारतीय संघाचा संभाव्य प्लेइंग 11:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, रिंकू सिंग, रमणदीप सिंग, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई आणि अर्शदीप सिंग

हेही वाचा-

IND vs ENG; पाचव्या सामन्यात या खेळाडूंवर विशेष लक्ष, महान विक्रम रचण्याची संधी
चॅम्पियन्स ट्राॅफीत रोहित-विराट घालणार धुमाकूळ, प्रशिक्षकाची मोठी प्रतिक्रिया
शाब्बास..! स्मृती मानधनानं घडवला इतिहास, चौथ्यांदा जिंकला बीसीसीआयचा सर्वात मोठा पुरस्कार

Comments are closed.