नक्षलवाद्यांनी घरातून फरफटत बाहेर काढलं, गडचिरोलीत माजी पंचायत समितीच्या सभापतीला संपवलं अन्..
गॅचिरोली: गडचिरोली जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून नक्षलवाद्यांनी अनेक राजकीय नेते, कार्यकर्ते आणि नागरिकांना लक्ष्य केले जात असल्याच्या घटना वारंवार घडताना दिसून येत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा थरार माजवत भामरागड पंचायत समितीचे माजी सभापती सुकराम महागु मडावी (वय 46) यांची शनिवारी रात्री हत्या केली. घरातून उचलून गावालगत असणाऱ्या मैदानावर त्यांची हत्या केल्याचे उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान,मागील काही दिवसांपासून शांत बसलेल्या नक्षलवाद्यांनी पुन्हा एकदा माजी सभापतीची हत्या करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. मृतदेहाजवळ पत्रक देखील टाकले असून पोलीस अधिक तपास करीत आहेत. शनिवारी (1 फेब्रुवारी) रात्री सशस्त्र नक्षलवाद्यांनी गावात घुसून मडावी यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने बाहेर ओढून नेले. गावाच्या सीमेजवळ असलेल्या मैदानावर त्यांची निर्दयीपणे हत्या करण्यात आली. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात त्यांचा मृतदेह सापडला. विशेष म्हणजे नक्षलवाद्यांनी मृतदेहाजवळ पत्रक सोडले असून त्यात हत्या करण्याचे कारण नमूद असल्याची शक्यता आहे. (Gadchiroli Crime)
घरातून उचलून नेत हत्या
शनिवारी रात्री नक्षलवाद्यांनी मडावी यांना त्यांच्या घरातून जबरदस्तीने उचलून नेले आणि गावालगतच्या मैदानावर निर्घृण हत्या केली. घटनास्थळी पत्रक फेकून त्यांनी या हत्येची जबाबदारी स्वीकारली आहे.गेल्या काही दिवसांपासून नक्षलवादी हालचाली कमी झाल्या होत्या, मात्र या हत्येने नक्षलवादी पुन्हा सक्रिय होत असल्याची गावात चर्चा आहे.घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. (Naxalites Terror)
नक्षलवादी पुन्हा ॲक्टीव्ह?
नक्षलवादी गेल्या काही दिवसांपासून थंड होते. मात्र, या हत्येने त्यांचा गडचिरोलीतील प्रभाव पुन्हा दिसून येतोय. राजकीय नेत्यांच्या हत्यांमुळे गडचिरोलीतील परिस्थिती अधिक गंभीर बनली असून, प्रशासनासमोर आता नक्षल प्रभाव रोखण्याचं मोठं आव्हान उभं राहिलं आहे. गेल्या काही दिवसांपासून नक्षल चळवळ काहीशी शांत होती, मात्र या घटनेनंतर गडचिरोलीत पुन्हा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. माजी सभापतींच्या हत्येमुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण असून, कुणीही यावर उघडपणे बोलण्यास तयार नाही. एकीकडे नक्षली हिंसाचाराने लक्ष्य होत असलेल्या गडचिरोलीत नवे प्रकल्प, गुंतवणूक, रोजगार निर्मितीची वचनं दिली जात असताना भामरागडच्या पंचायत समितीच्या माजी सभापतीची निर्घृण हत्या करण्यात आल्याने नक्षलवाद्यांची दहशत कशी थांबवणार असा सवाल उपस्थित केला जातोय.
हेही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.