स्वप्नपूर्ती.! भारतीय महिला संघाने जिंकला अंडर-19 टी20 वर्ल्डकप, फायनलमध्ये आफ्रिकेला लोळवले

निक्की प्रसादच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघाने यंदाचा आयसीसी अंडर-19 टी20 विश्वचषक जिंकला आहे. विजेतेपदाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना भारताने सहज विजय मिळवला आहे. टीम इंडिया संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहली.

सामन्याबद्दल बोलायचे झाल्यास, दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण हा निर्णय त्यांच्यावरच उलटला संघाने दुसऱ्या षटकात 11 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर भारतीय गोलंदाजीच्या आक्रमणासमोर आफ्रिकेच्या कोणत्याही फलंदाजाचा टिकाव लागला नाही. संघ सातत्याने विकेट्स गमावत राहिला. परिणामी संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारता आले नाही. मर्यादित 20 षटकात आफ्रिकेने केवळ 82 धावा केल्या. आफ्रिकेकडून मिके व्हॅन वुर्स्टने सर्वाधिक 23 धावा केल्या. गोलंदाजीत भारताकडून पारुनिका सिसोदिया, वैष्णवी शर्मा आणि आयुषी शुक्ला यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट्स घेतल्या.

लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सलामी जोडी यावेळी स्वस्तात बाद झाली. संघाची सलामीवीर कमलिनी 8 धावांवर बाद झाली. यानंतर भारतीय संघाने एकही विकेट गमावला नाही. दुसऱ्या विकेटसाठी गोंगाडी त्रिशा आणि सानिका चिलके यांच्यातील 48 धावांच्या निर्णायक भागीदारीच्या जोरावर भारताने सामना सहज जिंकला. ज्यात गोंगडी त्रिशाने सर्वाधिक 44 धावा केल्या. आशाप्रकारे भारताने दक्षिण आफ्रिकेवर 9 विकेट्स आणि 8.4 षटके राखून विजय मिळवला.

बातमी अपडेट होत आहे….

Comments are closed.