सरकारी नोकरीची मोठी संधी! अर्ज करण्यासाठी उरले फक्त काही  दिवस, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया

कॅनारा बँक जॉब्स: सरकारी नोकरीची इच्छा असणाऱ्या तरुणांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. कॅनरा बँकेत भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. कॅनरा बँकेने क्रेडिट ऑफिसर (कनिष्ठ व्यवस्थापन ग्रेड स्केल I) च्या पदांसाठी अर्ज मागवले आहेत. या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 30 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून इच्छुक उमेदवार 20 फेब्रुवारी 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करु शकतात.

उमेदवाराने किमान 60 टक्के गुणांसह पदवी पूर्ण करणं गरजेचं

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवाराने किमान 60 टक्के गुणांसह पदवी पूर्ण केलेली असावी. तसेच SC/ST/OBC/PWBD श्रेणीतील उमेदवारांना 5 टक्के सूट दिली जाते, या श्रेणीतील उमेदवारांना 55 टक्के ठेवण्यात आली आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय किमान 20 वर्षे आणि कमाल 30 वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयात सवलत दिली जाईल. सर्व सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे, तर SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 150 रुपये ठेवण्यात आले आहे. फी फक्त ऑनलाइन पद्धतीने जमा करता येईल.

वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करा

ibpsonline.ibps.in/cbicojan25/ मुख्यपृष्ठावर “नवीन नोंदणीसाठी येथे क्लिक करा” वर क्लिक करा आणि आवश्यक माहिती भरून नोंदणी करा नंतर उर्वरित तपशील भरा स्वाक्षरी आणि छायाचित्र अपलोड करा विहित पैसे भरा. ऑनलाइन फी आणि फॉर्म सबमिट करा.

सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांसाठी मोठी संधी

दरम्यान, ज्या उमेदवारांना सरकारी नोकरी करायची आहे किंवा सरकारी नोकरी मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, अशांसाठी ही मोठी संधी आहे. यासाठी फक्त पदवीपर्यंत शिक्षण होणे गरजेचे आहे. ज्यांचे शिक्षण 60 टक्के गुणांसह पदवीपर्यंत झालं आहे, त्यांच्यासाठी ही मोठी संधी मानली जात आहे. त्यामुळं पात्र असणाऱ्या उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, अरप्ज करण्याची अंतिम तारीख ही 20 फेब्रुवारी देण्यात आली आहे. त्यापूर्वीच उमेदवारांनी अर्जाची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान, कॅनरा बँकेने काढलेल्या क्रेडिट ऑफिसर या पदासाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रथम ibpsonline.ibps.in/cbicojan25/  या वेबसाईट जावं लागेल. या बेवसाईटवर तुम्हाला याबाबतची सविस्तर माहिती मिळेल. अर्ज करण्यासाठी सर्व सामान्य श्रेणीतील उमेदवारांसाठी अर्जाची फी 750 रुपये आहे, तर SC/ST/PWBD प्रवर्गातील उमेदवारांसाठी शुल्क 150 रुपये

महत्वाच्या बातम्या:

सरकारी नोकरीची मोठी संधी! BHEL मध्ये 400 पदांसाठी भरती प्रक्रिया, काय आहे पात्रता? कसा कराल अर्ज?

अधिक पाहा..

Comments are closed.