Union Budget 2025 DCM Eknath Shinde reaction
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी 2025) सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद जाहीर केल्या आहेत. तसेच शेतकरी, महिला आणि नोकरदारांसाठी या बजेटमधून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
मुंबई : अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय अर्थसंकल्प 2025-26 चं स्वागत केलं. (Union Budget 2025 DCM मराठी reaction)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसऱ्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (1 फेब्रुवारी 2025) सादर करण्यात आला. यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वेगवेगळ्या क्षेत्रांसाठी भरीव तरतूद जाहीर केल्या आहेत. तसेच शेतकरी, महिला आणि नोकरदारांसाठी या बजेटमधून मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक्सवर पोस्ट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे आभार मानले आहेत.
एकनाथ शिंदेंच्या एक्स पोस्टमध्ये काय?
“देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व असंच करावं लागेल. 12 लाखापर्यंतच्या उत्पन्नावर संपूर्ण करमुक्ती मिळाल्याने आता घराघरात लक्ष्मीची पावलं उमटल्याशिवाय राहणार नाहीत. एक सर्वांगसुंदर, आत्मनिर्भर भारताला सबळ करणारा हा अर्थसंकल्प सादर केल्याबद्दल मी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करतो, आणि महाराष्ट्रातल्या तमाम नोकरदारांतर्फे त्यांचे आभारही मानतो”, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
लक्ष्मीच्या पाऊलखुणा उमटल्या…
देशाचे लोकप्रिय आणि कर्तृत्ववान पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजींनी विकसित भारताचं पाहिलेलं स्वप्न प्रत्यक्षात येणार, याची खात्री देणारा केंद्र सरकारचा अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्पात सामान्य नोकरदार वर्गाला जो दिलासा मिळालाय, त्याचं वर्णन अभूतपूर्व…
— मराठी – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) February 1, 2025
“शिक्षण, आरोग्य आणि कृषी या तिन्ही महत्त्वाच्या क्षेत्रांना अर्थसंकल्पातील कल्पक तरतुदींचा लाभ होणार असल्याने देशाच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत जाणार यात शंकाच नाही. हा सशक्त भारताचा रोडमॅप आहे. दुरवस्था संपवून पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्त्वात आपला भारत देश सुबत्तेच्या दिशेनं वाटचाल करु लागल्याची ही शुभचिन्हे आहेत”, असेही एकनाथ शिंदे यांनी एक्स पोस्टमध्ये लिहिलं आहे.
हेही वाचा – Budget 2025 Speech Live : गंभीर आजाराची 36 औषधे ड्युटी फ्रि; निर्मला सीतारामन यांची सर्वात मोठी घोषणा
Comments are closed.